ETV Bharat / state

राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन केल्यास पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

author img

By

Published : Apr 13, 2021, 12:02 PM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात पुन्हा पूर्ण कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाल्यास त्याला व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे.

Pune Chamber of Commerce lockdown support news
पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊन पाठिंबा बातमी

पुणे - राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती रूग्ण संख्या चिंतेची बाब असल्यामुळे राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, रूग्ण संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. राज्यात पूर्ण लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत दररोज नेत्यांच्या बैठका होत आहेत. जर राज्य शासनाने पूर्ण लॉकडाऊन घोषित केले तर पुणे व्यापारी महासंघ त्याला पाठिंबा देणार आहे. मात्र, या काळात मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाइन विक्रीसाठी सूट दिली तर, मग व्यापारीही गुरुवारपासून दुकाने उघडतील, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

अधिकारी आणि व्यापाऱ्यांची पार पडली बैठक -

कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेने शहरातील दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. परंतु, पुणे व्यापारी महासंघाने या निर्णयाला विरोध करत सोमवारपासून दुकाने उघडणार असल्याचा इशारा दिला होता. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले होता. त्यानुसार व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीनंतर व्यापारी महासंघाने आपली भूमिका बदलली असून सरकारने संपूर्ण लॉकडाऊन केला तर सरकारला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.

या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील कोरोनाची भयावह स्थिती सांगितली. मागील काही दिवसातील आकडेवारी देखील व्यापाऱ्यांना सांगितली. तसेच आगामी काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या आणखी वाढणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने न उघडण्याची भूमिका घ्यावी, अशी विनंती केली. कोरोनाची स्थिती पाहता आणि अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे व्यापारी महासंघाने आपले आंदोलन स्थगित केले असून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असे रांका यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.