ETV Bharat / state

दौंड तालुक्यातील पाटस येथील 'त्या' माय लेकरांच्या खुनच, पतीने केले हत्याकांड - Suicide and murder case

पाटस येथे एका सात वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतलेला अवस्थेतील मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता. मात्र महिलेच्या पतीनेच मुलासह पत्नीचा खून केला

माय लेकरांच्या खुनच, पतीने केले हत्याकांड

author img

By

Published : Apr 28, 2021, 2:03 PM IST

दौंड(पुणे) - दौंड तालुक्यातील पाटस येथे एका सात वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतलेला अवस्थेतील मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता. प्रथमदर्शनी आत्महत्या आहे असे वाटणाऱ्या या प्रकरणात यवत पोलिसांनी योग्य रीतीने तपास केला आणि मायलेकरांची आत्महत्या नसून खुनच असल्याचे उघडकीस आणले. या महिलेच्या पतीनेच मुलासह पत्नीचा खून केला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.

मायलेकरांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी सकाळी लिना सचिन सोनवणे (वय 35 ) आणि ओम सचिन सोनवणे (वय 7) या आई आणि मुलाचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. स्वराज व्हॅली अपारमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर 9 मध्ये हे दोन्ही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब , पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना हे मृत्यू संशयास्पद वाटले.

घातपात झाल्याचा संशय -

या महिला आणि मुलाने आत्महत्या केली असल्याची खबर पाटस पोलीस स्टेशन येथे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता, पोलिसांना वेगळा संशय आला. त्या दिशेने पोलिसांनी तपास केला. तसेच या महिलेच्या नातेवाईकांनी आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता .

सचिन सोनवणे यानेच महिलेच्या मदतीने केली हत्या -

यवत पोलिसांनी तपासाची चक्रे योग्य रीतीने फिरवली आणि आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. सचिन दिलीप सोनवणे आणि त्याच्या सोबत राहणारी सोबत राहणारी महीला रेणुका उर्फ प्रणाली भारत तळेकर व एक अनोळखी यांनी संगनमताने हाताने मारहाण करून , गळा दाबुन त्या मायलेकरांना जिवे ठार मारले . तसेच सचिन सोनवणे याने मुलगी पुर्वा सचिन सोनवणे ( वय 10 वर्ष) हिचे उशीच्या सहायाने तोंड दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सचिन सोनवणे याने पत्नी लीना आणि मुलगा ओम याचा ही खुन करून त्यांनी आत्महत्या केेल्याचा बनाव केला. यासाठी दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकवला होते .

पोलिसांनी वैष्णवीला विश्वासात घेतले आणि सत्य समोर आलं -

मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर घटना संशयास्पद वाटली पोलिसांनी सखोल चौकशी करीत वैष्णवी हिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्याने आत्महत्या प्रकरणाचा उलगडा झाला,आणि 8 तासाच्या आत पोलिसांनी सचिन दिलीप सोनवणे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पती सचिन दिलीप सोनवणे (रा.पाटस ता.दौंड,जि.पुणे) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . याबाबत लीना सोनवणेचा भाऊ भाऊसाहेब मारूती शेलार यांनी तक्रार दिली .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.