ETV Bharat / state

पुण्यात कौटुंबिक वादातून पत्नीची गळा दाबून हत्या, पती अटकेत - कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या पुणे बातमी

महाविद्यालयातील मैत्रीणीसोबत दुसरे लग्न केलेल्या पतीने केवळ संशयावरून तिची गळा दाबून तिची हत्या केली. अपर्णा महाडिक असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती सुरेंद्र प्रकाश साळुंखे याला ताब्यात घेतले आहे.

एकीला गळा दाबून संपवलं
एकीला गळा दाबून संपवलं
author img

By

Published : Aug 27, 2020, 6:04 PM IST

पुणे : संशयाचे भूत एकदा मानगुटीवर बसले कि ते काही केल्या जात नाही. अन् मग त्यातून गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना पुढे येतात. पुण्याचा हडपसर परिसरातूनही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. दोन बायकांचा पती असलेल्या एकाने केवळ संशयावरून दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. अपर्णा महाडिक (वय 36) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती सुरेंद्र प्रकाश साळुंखे (वय 42) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र साळुंके याचा टुरिझमचा व्यवसाय आहे. त्याची दोन लग्न झालेली आहे. मृत अपर्णा ही त्याची महाविद्यालयापासूनची मैत्रीण होती. दोन्ही पत्नी पुण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या. अपर्णा महाडिक हिला बाहेर नोकरी करायची होती. मात्र, सुरेंद्र साळुंखे याचा विरोध होता. तसेच तो तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात सारखे भांडण होत होते.

नेहमीप्रमाणे गुरुवारीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापाच्या भरात सुरेंद्र साळुंके याने अपर्णा हिचा गळा दाबून खून केला. आणि तो घराबाहेर पडला. काही वेळानंतर घराशेजारी राहणाऱ्या इतर नागरिकांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी हडपसर पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपी सुरेंद्र साळुंखे याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये भाचीच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणाला मामाने दिला चोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.