ETV Bharat / state

पाहुण्याच्या घरी पतीने केली पत्नीसह अन्य एकाची हत्या, आरोपी जेरबंद

दौंड तालुक्यातील खुटबाव येथे पाहुण्यांकडे आलेल्या तरुणाने आपल्या पत्नीसह अन्य एकावर कोयता व काठीने मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

Husband killed his wife and another man in daund
अज्ञात कारणावरून पतीने केली पत्नीसह अन्य एकाची हत्या
author img

By

Published : Jul 31, 2020, 7:59 PM IST

दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील खुटबाव येथे पाहुण्यांकडे आलेल्या तरुणाने आपल्या पत्नीसह अन्य एकावर कोयता व काठीने मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी पती मंगेश अरुण जाधव (रा.विठ्ठलवाडी डॅम ता. शिरूर), पत्नी मनिषा ऊर्फ हनिबाई मंगेश जाधव (रा. विठठलवाडी ता. शिरूर) व दिपक वाघमारे (रा.भोर, जि. पुणे) हे आपल्या पाहुण्यांकडे खुटबाव येथील मटकळा वस्ती येथे आले होते. गुरुवारी (दि.३०)अज्ञात कारणावरून त्यांच्यात वादविवाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये आरोपी मंगेश जाधव याने त्याची पत्नी मनिषा व दिपक वाघमारे यांना कोयता व काठीने मारहाण केली. यात दोघांचाही मृत्यू झाला.

याप्रकरणी आरोपीवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.