ETV Bharat / state

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या - chandannagar police station news

13 वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. त्यांना 10 आणि 8 वर्षाची दोन मुले आहेत. मृत उषा गायकवाड या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायची.

Husband commits suicide by killing wife on suspicion of character in pune
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या
author img

By

Published : Jun 2, 2021, 9:17 AM IST

पुणे - चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने पत्नीचा खून करत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव शेरी येथील पिराजी नगरमध्ये हा प्रकार घडला. उषा योगेश गायकवाड (वय 28) आणि योगेश तानाजी गायकवाड (वय 33) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पती-पत्नीत सतत वाद -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. त्यांना 10 आणि 8 वर्षाची दोन मुले आहेत. मृत उषा गायकवाड या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायची. तर योगेश गायकवाड हा काहीही काम नसल्यामुळे घरीच बसून होता. दरम्यान, योगेश हा सारखा पत्नीच्या चारित्र्यवर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.

हेही वाचा - दोघी मैत्रिणींचा विहिरीत बुडून मृत्यू; दिंडोरीच्या सावरपावडा येथील घटना

सोमवारी रात्री ही त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. रात्री मुले झोपल्यानंतर योगेश गायकवाड यांनी गळा आवळून पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मुले जेव्हा झोपेतून उठली तेव्हा त्यांना वडील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले तर आई निपचित पडली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.