ETV Bharat / state

शंभर राजदूतांचा पुणे दौरा रद्द, सिरम इन्स्टिट्यूटला देणार होते भेट

येत्या 4 डिसेंबरला विविध देशांचे 100 राजदूत पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हे सर्व राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते.

सिरम इन्स्टिट्यूट
सिरम इन्स्टिट्यूट
author img

By

Published : Nov 27, 2020, 7:16 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (28 नोव्हेंबर) पुण्यात येऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. तसेच येत्या 4 डिसेंबरला विविध देशांचे 100 राजदूत पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हे सर्व राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. त्यांचा हा दौरा रद्द कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द

पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे. त्या लशीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी उद्या दुपारी १ ते २ या वेळेत येणार आहेत. त्यावेळी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत. तसेच ४ डिसेंबर रोजी १०० देशांचे राजदूत देखील या ठिकाणी येऊन कोविड लशीबाबत सद्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र, हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला असल्याची माहिती राज शिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.