ETV Bharat / state

What Is Honeytrap : हनीट्रॅपमध्ये कसे अडकवले जाते? कशी होते फसवणूक? पाहा व्हिडिओ... - डीआरडीओ संचालकासोबत हनीट्रॅप

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. एकूणच हनीट्रॅप म्हणजे काय? यात कशी फसवणूक केली जाते? याबाबत सायबर एक्स्पर्ट रोहन न्यायाधीष यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

Etv Bharat
याबाबत सायबर एक्स्पर्ट रोहन
author img

By

Published : May 5, 2023, 10:24 PM IST

Updated : May 6, 2023, 6:01 PM IST

हनीट्रॅपविषयी सायबर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

पुणे: हनीट्रॅप याची सुरवात ही सोशल मीडियाच्या माध्यमातून होते. सोशल मीडियावर ओळख निर्माण करून हळूहळू बोलते केले जाते. मॅसेजवर सुरू झालेला संवाद हा व्हिडियो कॉलवर आणला जातो आणि समोरची व्यक्ती इंटीमेड होऊन त्या व्यक्तीला नको ते कृत्य करायला प्रवृत्त करते. हनीट्रॅपची शिकार ठरलेल्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात आणि मग पैश्याची मागणी केली जाते. जर एखादा व्यक्ती हा मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याच्याकडून त्याच्या नोकरीची, संस्थानाची माहितीही घेतली जाते. अश्या पद्धतीने सध्या हनीट्रॅपमध्ये फसवले जाते.

समोर महिलाच नसते: हनीट्रॅपमध्ये फसविल्यानंतर सोशल मीडियावरून व्हिडिओ कॉल केला जातो. तेव्हा समोर एक मुलगी किंवा महिला असल्याचे दाखवले जाते आणि ती महिला बोलत आहे असे भासवून समोरच्या व्यक्तीला इंटीमेड केले जाते. याबाबत सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीष म्हणाले की, जेव्हा आम्ही अश्या केसेस बाबत तपास केला तेव्हा 80 टक्के लोकांना असेच वाटत की समोर एक मुलगी आहे म्हणून तो तिच्याशी बोलत आहे; पण प्रत्यक्षात तसे न होता जेव्हा व्हिडिओ कॉल केला जातो तेव्हा तो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या एवढ्या जवळ नेऊन एखाद्या मुलीचा व्हिडिओ प्ले केला जातो आणि त्याद्वारे फसवणूक केली जाते.

पेलोड सिस्टिमचा धोका: याबाबत सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीष पुढे म्हणाले की, जेव्हा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्या पद्धतीने पेलोड नावाचे जो सिस्टिम आहे हे समोरील व्यक्तीच्या नकळत त्याच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील सर्व डाटा हा समोरच्या कडे जातो. काल च्या प्रकरणात जर आपण पाहिले तर जर डीआरडीओच्या संचालकांनी जर त्यांच्या ऑफिशीयली लॅपटॉप किंवा मोबाईल वरून समोरच्या व्यक्तीशी बोलले असेल तर त्यांना माहीत देखील नसेल आणि संपूर्ण माहिती ही लीक झाली असेल. ही मोठी भीती व्यक्त केली जात आहे. मोबाईल आणि लॅपटॉपने जर त्या संस्थेच्या वायफायचा वापर केला असेल तर त्याद्वारे जे जे वायफायला कनेक्ट असेल त्या सर्वांची माहिती न कळत समोरच्या व्यक्तीला मिळेल अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

जनजागृती आवश्यक: यासाठी उपाय म्हणून आपण आपल्या मोबाईल तसेच लॅपटॉपमध्ये सेक्युरिटी तसेच अँटीव्हायरस टाकणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच ज्या व्यक्तीशी बोलत आहोत त्याबाबतची संपूर्ण माहिती घेणेदेखील महत्त्वाचे आहे. याबाबत जेवढी जास्त जनजागृती होईल तेवढी जास्त प्रमाणावर हे थांबवता येईल अस देखील यावेळी रोहन न्यायाधीष म्हणाले.

हेही वाचा: Ahmednagar Division: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी ही तीन नावे नव्या जिल्हा मुख्यालयासाठी आघाडीवर

Last Updated : May 6, 2023, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.