पुणे - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. संजय भरत सीनारे (वय 32) असे त्याचे नाव आहे. आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. आर्थिक कारणातून त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सिनारे हे चाकण येथील रहिवासी आहेत. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी ते बेपत्ता झाले होते. चाकण पोलीस ठाण्यात या चेहऱ्यासंबंधी तक्रारही दाखल आहे. कात्रज परिसरातील भारती विद्यापीठाच्या पाठीमागे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ते काही दिवसांपासून कामाला होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर मालक घरी निघून गेले तर संजय सीनारे हे हॉटेलमध्ये झोपले होते.
आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी रविवारी सकाळी हॉटेल मालक जेव्हा हॉटेलमध्ये आले तेव्हा त्यांना संजय सिनारे यांनी गळफास घेतल्याचे दिसले.
हॉटेल मालकाने तातडीने ही माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत
आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी