ETV Bharat / state

निवडणुका बिहारमध्ये अन् फटका पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना!

५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानुसार व्यावसायिकांनी तयारी केली मात्र, आता कामगारांची समस्या उभी राहिली आहे. ज्या हॉटेल व्यावसायिकांकडे बिहारमधील कामगार काम करत आहेत, ते निवडणुकीमुळे अद्याप परत आलेले नाहीत.

Hotel
हॉटेल
author img

By

Published : Oct 20, 2020, 5:02 PM IST

पुणे - अनलॉक सुरू झाल्यापासून शासन हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास कधी परवानगी देते, याकडे मालक डोळे लावून बसले होते. शासनाने अनलॉक-५ परवानगी दिली. मात्र, हॉटेल व रेस्टॉरंट मालकांच्या अडचणी संपत नसल्याचे दिसते आहे. आता बिहारमध्ये होणाऱया निवडणुकीचा फटका पुण्यातील हॉटेल मालकांना बसला आहे. बिहार निवडणूक आणि पुण्यातील हॉटेल्सचा काय संबध हा प्रश्न पडणे साहजिक आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी पुण्याच्या मध्यभागी असलेल्या अविष्कार रेस्टॉरंटचे मालक बाळासाहेब अमराळे यांच्याशी संवाद साधला आहे.

अविष्कार रेस्टॉरंटचे मालक बाळासाहेब अमराळे यांनी व्यवसायाची माहिती दिली

राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्य शासनाने हॉटेल व रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अनलॉक सुरू झाल्यानंतर काही निर्बंध कायम ठेवत हॉटेल व रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकत रेस्टॉरंटस् आणि हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शासनाने परवानगी दिली असली तरी बाहेरील राज्याचे कामगार परत न आल्याने हॉटेल चालकांना काम करणे कठिण झाले आहे, असे अमराळे म्हणाले.

पुण्यातील महात्मा फुले मंडईत अविष्कार रेस्टॉ अँड बार हे जूने हॉटेल आहे. या रेस्टॉरंटमध्ये विविध राज्यातील तसेच कोकणातील ४० पेक्षा अधिक कामगार काम करत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार आपापल्या गावी परत गेले. आता अनलॉक होऊनही बिहार आणि बंगालमधील कामगार परत आले नाहीत. त्यामुळे अविष्कार रेस्टॉरंटमध्ये सध्या फक्त ८ ते ९ कामगार काम करत आहे. बिहारमधील कामगारांशी संपर्क केला असता त्यांनी निवडणूक झाल्यानंतर परत येऊ, असे सांगितले. बंगालमधील कामगारांनी नवरात्रीनंतर कामावर येण्याची तयारी दर्शवली.

पुणे शहरात अजूनही बाहेरील विद्यार्थी, काम करणारे कर्मचारी परत न आल्याने ५० टक्के क्षमतेने जरी हॉटेल व्यवसाय सुरू झाला असला तरी व्यवसाय रुळावर आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.