पुणे: पहिला प्रेमविवाह झालेला असतानाही दुसरीबरोबर लग्न करण्यासाठी पहिला पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला ( Pune crime news ) पौड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास केल्याने ( Paud Police arrest murder ) स्वप्निल विभिषण सावंत ( Swapnil Sawant kill wife ) याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिचा खून केला असल्याचे तपासात उघड झाले.
आरोपी स्वप्निल सांवत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिला ठार मारण्यासाठी तो काम करीत असलेल्या खासगी हॉस्पिटलमधून ( Murder by injection ) गुपचूप घातक औषधे घरी नेले. ही औषधे मृत पत्नी प्रियांका सावंत हिला दिली. बीपी आणि शुगर कमी होण्यासाठी असलेले दोन इंजेक्शन तसेच इतरही काही इंजक्शन अधूनमधून प्रियांकाला दिली. या औषधामुळे तिचा मृत्यू झाला. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे एका हॉस्पीटलमधील आयसीयु वाॅर्डमध्ये ब्रदर्स (परिचारक) म्हणून काम करणारा स्वप्निल विभिषण सावंत (वय २३, रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) याचा प्रियांका क्षेत्रे (वय २२) हिच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. ५ महिन्यापुर्वी कासार आंबोली येथे भाड्याने खोली घेऊन ते दोघेही राहायला आले होते.
आधी दाखल होता गुन्हा स्वप्नील याचे परिचारीका असलेल्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले व तिच्यासोबत दुसरे लग्न करण्याचे स्वप्न तो पाहू लागला. परंतु पहिले लग्न प्रियांका क्षेत्रे सोबत झाल्याने त्याला दुसरे लग्न करता येत नव्हते. त्यामुळे त्याने पत्नी प्रियांका क्षेत्रे हिला राहत्या घरी ठार मारून घोटावडे फाटा येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा खोटा प्रयत्न केला. तेथील डॉक्टरांनी पौड पोलिसांना कळवून अकस्मात मृत्यूची माहिती दिली. प्रियांका हिच्या घरच्यांनी स्वप्निल सावंत याच्या विरूद्ध मानसिक छळ केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.
या पोलिसांनी केला तपास : खुनाचा तपास पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेबे ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पवन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलीस हवालादार आनंदा बाठे यांच्या पथकाने केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे करीत आहेत.