ETV Bharat / state

अमलीपदार्थ विरोधी मोहिमेत तरुणाईने अमली पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची केली होळी - जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन

आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्यावतीने जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणाईने एकत्र येत अमली पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. तसेच 'से नो ड्रग्स'चा संदेशही दिला.

Holi celebrated by youth in anti-drug campaign in pune
अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत तरुणाईने केली होळी
author img

By

Published : Jun 27, 2021, 12:56 PM IST

पुणे - अमली पदार्थांच्या विळख्यात सहजपणे फसते ती तरुणाई. त्याचा प्रसार रोखला नाही तर संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होते. त्यामुळे समाजात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जागृती करण्यासाठी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त तरुणाईने एकत्र येत अमली पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली आहे. यावेळी त्यांनी 'से नो ड्रग्स'चा नारा दिला.

अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत तरुणाईने केली होळी

आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, भाजपा एनजीओ आघाडी व मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सच्यावतीने जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, स्वरदा बापट, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण ड्राइव्हची देखील व्यवस्था करण्यात आली.

Holi celebrated by youth in anti-drug campaign in pune
अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत तरुणाईने केली होळी

दारू पेक्षाही भयंकर व्यसनाच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे -

दारूमुळे शारीरिक त्रास होणे हे व्यसनाचे अत्यंत साधारण रूप झाले आहे. आज याहीपेक्षा भयंकर व्यसनाच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे. व्यसन लागणाऱ्या गोष्टींची हल्ली सहज उपलब्धता होते. त्यामुळे त्याचा वापर सर्रास होत असल्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आरोग्यदायी आयुष्य हा साधा सरळ विचार आहे. परंतु अंमली पदार्थांचे व्यसन हा आकर्षणाचा विषय आहे. ते आकर्षण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. असे यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे म्हणाले.

आता समउपदेशनाची सुरूवात १४ ते १५ वयोगटापासूनच -

गेल्या काही वर्षात अमली पदार्थ व्यसनांची दाहकता इतकी वाढली की, समउपदेशनाची सुरूवात ही १४ ते १५ वयोगटातील मुलांपासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर व्यसन करण्याचे विविध प्रकार देखील समोर येत आहेत. पुण्यातील तरुणाईमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर महिलांचे प्रमाण देखील वाढत आहे. तरुणाईला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी तरुणाईने एकत्र येत अमली पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या होळी दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अशी माहिती यावेळी डॉ. अजय दुधाणे यांनी दिली.

हेही वाचा - जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विशेष: सहा महिन्यात आर्थिक राजधानीत 43 कोटींची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.