पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा व्यतिरिकत हिंदू महासंघाकडून आनंद दवे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचे चिन्ह हे बासरी असून सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आता हिंदू महासंघात मतभेद असल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी आम्हाला असे दिसते की, ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन एकतर्फी प्रचार करत आहेत. त्यामुळे आम्हाला हे विचार पटत नसल्याचे रोहित धोत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
आनंद दवेंना अडचणीत: कसबा विधानसभेत गाजत असलेला पुनेश्वर मंदिराचा मुद्दा महासंघांकडून प्रामुख्याने घेतला जातो. हा मुद्दाच महासंघाचा नसल्याचे रोहित धोत्रे यांनी म्हटले आहे. यासाठी अनेक स्थानिक लोकांवर केसेस आहेत. अनेकांनी यासाठी आंदोलन केले असल्याचे रोहित धोत्रे म्हणाले. त्यामुळे ज्या मुद्द्यावर निवडणूक होत आहे, त्यावर आनंद दवेंना अडचणीत येण्यासारखे स्टेटमेंट त्यांच्या या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
आनंद दवेबद्दल नाराजी: भाजपा सरकार हिंदुत्ववादी राष्ट्रीयपक्ष आपल्याला बोलवत असेल, आपल्याशी चर्चा करत असेल आणि भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढू असे सांगितले. तर मनमानीपणे आनंद दवे सगळा कारभार करत असून त्यांच्यासोबत जात नाहीत. त्यामुळे हिंदू महासंघ वाढला असे वाटत नाही. आनंद दवेबद्दल हिंदू महासंघातच नाराजी असल्याची रोहित धोत्रे यांनी म्हटले आहे.
हिंदू मताचे विभाजन: एकीकडे हिंदू मताचे विभाजन होईल या दृष्टीने आनंद दवे यांना समजावण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. परंतु आता आनंद दवे यांच्याच महासंघात फूट पडल्याने, नेमकं काय होणार हा प्रश्न आता कसबा निवडणुकीमध्ये पाहणे महत्वाचे आहे कारण आनंद दवे जर नाराज ब्राह्मण मताचे, हिंदू मताचे विभाजन केले तर त्याचा फटका भाजपाला बसणार आहे.
महासंघ कार्यकारणी मध्येच मतभेद: भाजपाकडून उमेदवारी देताना यावेळेस ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून ब्राह्मण समाज नाराज असल्यास बोलले जाते. त्यातच आनंदवे हे ब्राह्मण समाजाचे मताचे विभाजन करण्यासाठी उभे टाकले असल्याचा आरोप सुद्धा होत आहे. या सगळ्यांमध्ये महासंघ कार्यकारणी मध्येच मतभेद पुढे येत असल्याने याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
प्रचारासाठी विजय वडेट्टीवार पुण्यात: राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत असूनही ओबीसींच्या प्रश्नाकडे या मंडळींनी दुर्लक्ष केल्याने कसब्यातील ३६ टक्के ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवार पुण्यात आले होते. कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी, कॉंग्रेसचे निरीक्षक संजय राठोड आदी उपस्थित होते.
बेताल वक्तव्ये सुरु: राज्यात मंत्रिमंडळ पूर्ण अस्तित्वात आले नसून केवळ आमदार पोसण्याचे काम सुरु आहे. या मंडळांना विकास व सामान्य माणूस दिसत नसून मने कलुषित करणे आणि जात व धर्मात भांडणे लावायची एवढाच उद्योग त्यांनी सुरु ठेवला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. तसेच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपच्या मंडळीनी बेताल वक्तव्ये सुरु केले. सोशल मीडियात शिव्या खाण्याच्या प्रकारावरून ते किती अस्वस्थ झाले आहेत हे ध्यानात येते. चार वर्षे स्थायी अध्यक्ष राहिलेल्या उमेदवाराने शनिवारवाडा पाच मजली करण्याची भाषा करणे योग्यच म्हणावे लागेल. कारण मजले वाढविण्याचे काम त्यांच्या तोंडी सहज येते. ३५ वर्षे कसबा ताब्यात असताना मजले का वाढले नाहीत हे आता कसबेकर जनतेने ओळखले आहे.
चंद्रकांत पाटील यांची बाईक रॅली : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे हेमंत रासने, ते पन्नास हजाराच्या मताने निवडून येतील. असा विश्वास पालकमंत्री उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या प्रचारात बाईक रॅली काढून प्रचार केला आहे. ही रॅली कसबा विधानसभा मतदारसंघातील बिजनेस प्लाझा जानाई मळा ६ चनंबर कॉलनी सावित्रीबाई फुले स्मारका समोरून गंजपेठ पुणे जवळ कामगार मैदान इथेपर्यंत जाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.
सत्तेचा गैरवापर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे आमदार घरी व्यापाऱ्यांना बोलून, सत्तेचा गैरवापर करून धमकी दिली जात असल्याचा आरोप, नाना पटोले यांनी केला होता. त्या संदर्भात त्यांनी पुणे पोलिसांना एक निवेदन सुद्धा दिले होते. यावर बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, की वर्षानुवर्ष भाजपाच्या पाठीमागे व्यापारी उभा आहे. व्यापाऱ्याचे एलबीटी नावाचे कर्ज हे देवेंद्र फडवणीस यांनी माफ केले होते. कोविडच्या काळात विदाऊट मॉडेगाज 20 टक्के ज्यादाच कर भाजप सरकारने दिले होते. त्यामुळे व्यापारी शेतकरी ग्रहणी हे भाजपाच्या पाठीमागे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना धमकी द्यायचा प्रश्न येत नाही. ते ते स्वतः आमच्या सोबत आहेत. ते त्या विचारसरणीची सुद्धा आहेत.
हेही वाचा: Nana Patole मोदी सत्तेला विरोध करणारे कसबा हे देशातील पहिले ठिकाण ठरेल पटोले