ETV Bharat / state

माळीणला केलेल्या मदतीची परतफेड; कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या सेवेला धावली मंचर ग्रामपंचायत

आंबेगाव तालुक्यात माळीण गावात पाच वर्षापुर्वी मोठी आपत्ती आली होती. त्यावेळी देशभरातुन सर्वांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे आता ही परतफेड करण्याची वेळ आली असून माळीणकरांच्या वतीने मंचर ग्रामपंचायत सांगली, कोल्हापुर येथील पुरग्रस्तांना मदत करत आहे.

मंचर ग्रामपंचायतची मदत
author img

By

Published : Aug 14, 2019, 9:19 PM IST

पुणे - सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना देशभरातून मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. अशातच पुण्यातील मंचर ग्रामपंचायतीची एक टिम गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करत आहे. तर काही नागरिकांनी या भागात जीवनाश्यक वस्तुंची वाटप करुन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मंचर ग्रामपंचायतची मदत
आंबेगाव तालुक्यात माळीण गावात पाच वर्षापूर्वी मोठी आपत्ती आली होती. त्यावेळी देशभरातून सर्वांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे आता ही परतफेड करण्याची वेळ आली असून माळीणकरांच्या वतीने मंचर ग्रामपंचायत सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना मदत करत आहे. सध्या पूरस्थिती आटोक्यात आली असली तरी रोगराई पसरु नये, यासाठी उपाययोजना म्हणून फॉगिंगने फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, जनावरांवर देखील उपचार केले जात असून मंचरकरांची ही सेवा पुढील काही दिवस अशीच अविरत सुरू राहणार असल्याची माहिती मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजळे यांनी दिली.

Intro:Anc__सांगली कोल्हापुर पुरग्रस्तांना देशभरातुन मोठा मदतीचा ओग सुरु आहे अशातच पुण्यातील मंचर ग्रामपंचायतीची एक टिम गेल्या आठ दिवसांपासुन या परिसरात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करत आहे तर काही प्रमाणात नागरिकांना जीवनाश्यक वस्तुंचेही वाटप करुन आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे..

आंबेगाव तालुक्यात माळीण गावात पाच वर्षापुर्वी मोठी आपत्ती आली होती त्यावेळी देशभरातुन सर्वांनी मदतीचा हात पुढे केला होता त्यामुळे आता त्याचीच परतफेड करण्याची हि वेळ आली असुन माळीणकरांच्या वतीने मंचर ग्रामपंचायत सांगली,कोल्हापुर येथे मदतीचा हात पुढे देऊन काम करत आहे

सध्या पुरपरिस्थिती आटोक्यात आली असली तरी रोगराई पसरु नये यासाठी उपाययोजना म्हणुन फॉगिंग ने फवारणी करण्यात येत असुन जनावरांवरही उपचार केले जात असुन हिच मंचर करांची सेवा अजुनही काही दिवस अशीच सुरु रहाणार असल्याचे मंचरचे सरपंच दत्ता गांजळे यांनी सांगितले.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.