ETV Bharat / state

पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीची कोंडी - पुणे

शहरातील जंगली महाराज रोड, एफ सी रोड,  प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रोड, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रोड परिसरात दूरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत आणि पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीची कोंडी
author img

By

Published : Oct 9, 2019, 10:33 PM IST

पुणे - बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरात तुफान पाऊस झाला. काही वेळ पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूकीची कोंडी झाली.

पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीची कोंडी

शहरातील जंगली महाराज रोड, एफ सी रोड, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रोड, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रोड परिसरात दूरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत आणि पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा - पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी पावसाची बॅटींग.. मैदान चिखलमय

शहरातील सिंहगड रोड, टिळक रोड, सदाशिव पेठसह अनेक भाग आणि उपनगरांत वीज पुरवठाही खंडीत झाला होता. त्यामुळे पुणेकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज समोर ग्राहक पेठ येथे पीएमपीच्या बसवर झाड कोसळले. या घटनेत बस चालक अजूनही अडकला असून त्याला काढण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - मुंबई पूर्व उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरात 50 हुन अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शहरात पाणी तुंबण्याला पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Intro:Pune:-
पुण्यात तुफान पाऊस; रस्ते जलमय, गल्लीबोळात वाहतूक कोंडी

पुण्यात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास
तुफान पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस झाला. त्यामुळे शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रस्ता परिसरात दूरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पुणेकरांनी पाऊस थांबून, पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले. Body:शहरातील सिंहगड रोड, टिळक रोड, सदाशिव पेठसह अनेक भाग आणि उपनगरांत वीजही गायब झाली. त्यामुळे पुणेकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज समोर ग्राहक पेठ येथे पीएमपीच्या झाड कोसळले. यामध्ये चालक अजूनही अडकला असून त्याला काढण्याचे काम सुरू आहे..Conclusion:आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात
रस्त्यांवर झाडे कोसळण्याचाही घटना घडल्या. 50 हुन अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
शहरात पाणी तुंबण्याला पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.