पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली. कोरोनाचा पार्श्वभूमीवर रस्ते सामसूम असल्याने कोणाची धावपळ झाली नसली तरी कर्तव्यावर असलेले पोलीस पावसामुळे निवारा शोधत असल्याचे पाहायला मिळाले.
सध्या मे महिना असल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घामाघूम झालेल्या नागिरकांना आज थोडासा गारवा अनुभवायला मिळाला. आज सकाळीपासूनच पिंपरी-चिंचवड परिसरात ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी 5च्या सुमारास अचानक अंधारून आले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. दरम्यान, लहान मुलांसह तरुण आणि तरुणी यांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.