ETV Bharat / state

पुणे : आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार; विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला

राज्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. सर्व विभागातील लाखो पदे रिक्त असताना सुद्धा राज्य सरकार नोकर भरती करायला तयार नाही. सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेतल्या पाहिजेत. वेगवेगळ्या विभागाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलांची झुंबड असताना त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुरळीत केंद्रे मिळत नाहीत.

health department exam
आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार
author img

By

Published : Oct 25, 2021, 4:41 AM IST

पुणे - आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट गैरप्रकार व परीक्षा रद्द करण्यापासून सुरू झालेला गोंधळातील प्रवास आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे व ढिसाळ नियोजनामुळे आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा उशिरा सुरू झाल्याने परत गोंधळ निर्माण झाला.

आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील याबाबत बोलताना

राज्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. सर्व विभागातील लाखो पदे रिक्त असताना सुद्धा राज्य सरकार नोकर भरती करायला तयार नाही. सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेतल्या पाहिजेत. वेगवेगळ्या विभागाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलांची झुंबड असताना त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुरळीत केंद्रे मिळत नाहीत. महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक दृष्ट्या वेळोवेळी नुकसानीत टाकले जात आहे. 'इतर परीक्षेचे वसूल केलेले पैसे विद्यार्थ्यांना तत्काळ परत मिळाले पाहिजेत.' आजतर बरेच विद्यार्थी परीक्षेचे सेंटर इतर जिल्ह्यात आल्यामुळे अडचणीच्या काळात सुद्धा प्रवास खर्च करून पोहोचलेले असताना ऐनवेळी परीक्षा सुरू न होणे, एकाच विद्यार्थ्यांना सारख्या वेळेत दोन पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार जबाबदार आहे. तर याप्रकरणी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या संंचालक अर्चना पाटील म्हणाल्या.

आरोग्य विभागाची गट क ची परीक्षा झाली. ही परीक्षा 2 शिप्ट मध्ये झाली असून या परीक्षेला राज्य भरातून 4 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेच्या सर्व गोष्टींचे नियोजन न्यासा कंपनीकडे दिले गेले होते. त्यामुळे ही आरोग्य विभागाची परीक्षा न्यासामार्फत घेतली गेली. मात्र, न्यासाची परीक्षेच्या दिवसापर्यंत तयारी पूर्ण झाली नाही. म्हणून पहिली परीक्षा पुढे ढकलली गेली आणि परीक्षेची पुढची तारीख ठरविण्यात आली. यावेळीही न्यासाकडून ज्या गाड्यांमधून परीक्षेचे पेपर पाठवण्यात आले त्या गाड्या वेळेत पोहोचल्या नाही. तर काही गाड्या वेगळ्याच सेंटवर पोहोचल्या. तर काही गाड्यांचे टायर पंक्चर झाले, अशी कारणे देण्यात आली.

हेही वाचा - गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयांचा पुढाकार मोलाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

प्रवास भत्ता राज्य सरकारने द्यावा -

सर्व मुलांची होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन भरपाई म्हणून सर्व मुलांना खर्च झालेला प्रवास भत्ता राज्य सरकारने द्यावा. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील भोंगळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने जबाबदार व्यक्तींना निलंबित करावे आणि या परीक्षार्थीना योग्य न्याय द्यावा, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याबाबत बोलताना

काही मुलांना वेळेवर कोड मिळाले नाही तर काहींना चुकीचे कोड मिळाले. काही जिल्ह्यात खुप गोंधळाच्या घटना घडल्या. प्रश्नपत्रिका पोहोचविण्यासाठी ज्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्या वेगळ्याच ठिकाणी पोहोचल्या. त्यामुळे परीक्षा पेपर अदलाबदल झाली आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागला. ज्याठिकाणी उमेदवाराची चूक नाही त्याठिकाणी गोंधळ झाला. त्याचे नुकसान होणार नाही, अशी हमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर मात्र, या परिस्थितीला जबाबदार कोण? आणि मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांना शासन होणारं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.