पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींचा महिमा अफाट आहे, हे काही वेगळे सांगायला नको. आषाढी वारीत बालपणापासून ते वयाच्या 80 व्या वर्षी देखील एक आजीबाई पालखी सोहळ्यांमध्ये हलगी वाजवतात. त्यांच्या तालावर महिला वारकऱ्यांची फुगडी चालते.
आळंदी ते पंढरपूर असा पालखी सोहळ्याचा पायी प्रवास सुरू असताना या आजीबाई हलगी वाजवून माऊलींच्या भक्तीचा महिमा सांगतात. वारीत सहभागी झालेल्या महिला वारकरीही ठेका धरत फुगडी खेळतात.
इंद्रायणीच्या घाटावर या आजीबाईंनी हलगीच्या तालावर ठेका धरला आणि इंद्रायणी घाटावर आलेल्या महिलांनी या ठेक्यावर फुघडी खेळायला सुरुवात केली. भक्तिमय वातावरणाचा क्षण अगदी डोळे मिटवून टाकणारा होता.