पुणे : पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी स्कुलच्या बसला किल्ले रायगडजवळ ( Gyan Prabodhini School bus accident ) अपघात झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. चालकाचा ताबा सुटाळ्याने अपघात झाला असल्याची माहिती देण्यात येत असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली आहे. मात्र या अपघातामध्ये बसमधील १५ जणांना दुखापत झाली ( 15 injured in accident ) आहे. जखमींवर माणगाव तसेच पाचाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात : शुक्रवारी संध्याकाळी किल्ले रायगड पाहण्यासाठी आलेल्या पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या बसला अपघात ( Accident near Raigad Fort ) झाला. रायगड, निजामपूर मार्गावरील घरोशी गावाजवळ हा अपघात झाला असून, यामध्ये बस चालकासह १५ जणांना दुखापत झाली आहे. रायगड किल्ल्यावरून पुणे, निगडी येथे जाणारी ही बस घरोशीवाडी येथील निजामपूर रोडवर वरील वळणावर आली असता, वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ( driver loss control on bus ) , बस रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अपघात होताच तात्काळ मदतकार्य करून, सर्व प्रवाशाना बाहेर काढण्यात आले असून, जखमींना माणगाव तसेच पाचाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
तात्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला : ज्ञान प्रबोधिनी हायस्कूल निगडी येथील पालक संघातर्फे ही सहल आयोजित करण्यात आली होती. अपघातावेळी बसमध्ये २६ स्त्रिया, ४ मुले, ३ पुरुष असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये १५ जणांना किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली असून, अपघातानंतर मिळालेल्या तात्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.