पुणे Guardian Minister : राज्याच्या राजकारणात शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासह जिल्ह्याचे पालकमंत्री देखील बदलणार अशी चर्चा सुरू होती. त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांच्या जागी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आलंय. मुख्यमंत्री सचिवालयाकडून ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली. यात अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं. तर चंद्रकांत पाटील यांना अमरावतीचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :
- पुणे - अजित पवार
- अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील
- सोलापूर - चंद्रकांत पाटील
- अमरावती - चंद्रकांत पाटील
- भंडारा - विजयकुमार गावित
- बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील
- कोल्हापूर - हसन मुश्रीफ
- गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम
- बीड - धनंजय मुंडे
- परभणी - संजय बनसोडे
- नंदूरबार - अनिल भा. पाटील
- वर्धा - सुधीर मुनगंटीवार