पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघात आज भाजप-शिवसेना युतीचाकार्यक्रम झाला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप व शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी युतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन आले.
शिरूर विधानसभा, भोसरी विधानसभा, हडपसर विधानसभा व विविध स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये भाजपची एक वेगळी ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे युतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी शिवसेना व भाजपच्या गटबंधनातून एक मोठी ताकद तयार करण्यासाठी युतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते व बूथप्रमुखांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहे. मागील ५ वर्षात केंद्राने व राज्याने केलेली कामे व योजना या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युतीच्या उमेदवाराला योग्य पद्धतीने नागरिकांची साथ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी गिरीश बापट यांनी व्यक्त केला.