ETV Bharat / state

Father Died After Son Death : हाताशी आलेल्या मुलाचे अचानक निधन; धक्का सहन न झाल्याने बापाने सोडले प्राण - Grieving death of son

मुलाच्या निधनाचा शोक अनावर झाल्याने वडिलांनीही सोडला प्राण father died after son death सोडला. ही घटना पुण्यातील नांदेड सिटीमध्ये घडली. एकुलत्या एक मुलाचे अल्पशा आजाराने निधन (Grieving death of son) झाले. Latest news from Pune

Father Died After Son Death
मुलाच्या निधनानंतर वडिलांचेही निधन
author img

By

Published : Nov 19, 2022, 4:32 PM IST

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या चिन्मय सातपुते या एकुलत्या एक मुलाचे अल्पशा आजाराने निधन (Grieving death of son) झाले. हा मानसिक धक्का सहन न करु शकल्याने बापाने देखील आपले प्राण (father died after son death) सोडले. त्यामुळे सलग झालेल्या दोन आघाताने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. Latest news from Pune

मुलाच्या मरणाचे दु:ख पचवू शकले नाही - पुण्यातल्या नांदेड सिटीत गेल्या सहा वर्षांपासून सातपुते कुटुंब वास्तव्यास आहे. वडील दिलीप सातपुते हे महावितरणने निवृत्त झाले आहेत. चिन्मय हा संगणक अभियंता होता. चिन्मयची पत्नी दीपा ही देखील शिक्षिका म्हणून एका शाळेत कार्यरत आहे. त्याचे वडील रिटायरमेंटचा आनंद घेत होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र मुलाचा अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्याच्या निधनाने वडील पुरते कोसळून गेले. संपूर्ण कुटुंब हादरून गेले. या घटनेने शोककळा पसरली आहे. चिन्मयचे वय अवघे ३७ आणि वडिलांचे वय ७१ वर्ष हाताशी आलेला मुलगा अचानक डोळ्यासमोर गेला. हाताशी आलेला मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा जाती ना जातो तोच बापाने देखील मुलाच्या धसक्याने आपले प्राण सोडले. त्यामुळे सलग झालेल्या आघाताने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

चिन्मय होता उत्कृष्ट जलतरणपटू- चिन्मय याला बॅडमिंटनपटू आणि पोहण्याची प्रचंड आवड होती. तसेच उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तो परिसरात परिचित होता. सेवानिवृत्त झालेले त्यांचे वडील दिलीप सातपुते (वय 71) यांचेही ही गुरुवारी निधन झाले. दिलीप यांचा स्वभाव शांत, हळवा. आपल्या नातवंडासोबत आपला आनंदाने व्यतीत करीत होते. चिन्मय हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाचा धक्का ते सहन करून शकले नाहीत. त्याच्या विरहाने त्यांनी प्राण सोडले आहेत. पत्नी देखील या धक्कायातच असून तिच्यावर संकट कोसळले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.