ETV Bharat / state

Wine At Supermarket : सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील 'या' गावात वाईन विक्रीला परवानगी न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

राज्य सरकारने सुपर मार्केट्समध्ये वाईन विक्री ( Wine At Supermarket ) करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला पुण्यातील पारगाव ग्रामपंचायतीने विरोध केला ( Pargaon Gram Panchayat Opposes Wine At Supermarket ) आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे.

author img

By

Published : Feb 3, 2022, 10:32 PM IST

पारगाव ग्रामपंचायत हद्दीत किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री न करण्याचा ठराव

पुणे : नुकतंच राज्य शासनाच्यावतीने सुपरमार्केट आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय ( Wine At Supermarket ) घेण्यात आला असून, या निर्णयाविरोधात पुणे जिल्ह्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला आहे. पारगाव ग्रामपंचायत हद्दीत किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री न करण्याचा ठराव करण्यात आला ( Pargaon Gram Panchayat Opposes Wine At Supermarket ) आहे.

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील 'या' गावात वाईन विक्रीला परवानगी न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील गाव

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील किरणा मालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय पारगाव ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन ग्रामसभेमध्ये एकमताने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील गाव आहे.

विरोध करणारी पहिलीच ग्रामपंचायत

राज्य सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करणारी पुणे जिल्ह्यातील पारगाव ही ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीचा परवाना या ग्रामपंचायतीने दिला नाही. वाईन बंदीचा हा ठराव सामाजिक कार्यकर्त्या आणि महाराष्ट्र राज्य दारू निर्धारण समितीच्या सदस्या वसुधा सरदार व पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे यांनी मांडला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.