ETV Bharat / state

‘पीएमसी’ बँकेवर निर्बंध म्हणजे नोटबंदीची पुनरावृत्ती - गौरव वल्लभ - Pune News

लोकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व्ह बँक बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळोवेळी सूचना देत असते. पीएमसी बँकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही? असा सवाल गौरव वल्लभ यांनी उपस्थित केला.

गौरव वल्लभ
author img

By

Published : Sep 29, 2019, 9:12 PM IST

पुणे - पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अर्थात ‘पीएमसी’ बँक मागील वर्षापर्यंत 100 कोटी रुपये फायद्यात होती. 23 ते 25 सप्टेंबर या काळात, असे काय घडले की या बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदारांवर निर्बंध लादले गेले. या बँकेवर घातलेले निर्बंध म्हणजे नोटबंदीची पुनरावृत्ती असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे.

पुण्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

गौरव वल्लभ म्हणाले, लोकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व्ह बँक बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळोवेळी सूचना देत असते. पीएमसी बँकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही? या बँकेच्या संचालक मंडळात गेल्या 13 वर्षांपासून भाजपच्या एका खासदाराचा मुलगा आहे. त्यामुळे या बँकेच्या व्यवहारांवर शंका येते. बँकेवर घातलेले निर्बंध ही एक प्रकारची नोटबंदीची पुनरावृत्ती असल्याची टीका वल्लभ यांनी केली.

खातेदारांना महिन्याला 10 हजार रुपये काढता येतील, ही घातलेली अट मागे घेण्यात यावी. तसेच सगळ्या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - आंबेगाव तालुक्यात 'कांदा' चोरट्यांचा धुमाकूळ

हाऊडी मोदी कार्यक्रमावर टीका करताना वल्लभ म्हणाले, हाऊडी मोदी कार्यक्रमामधून भारताला काहीच मिळाले नाही. एच 1 बी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत मोदी ट्रम्प यांच्याशी काही बोलले नाहीत. भारतातून निर्यात होणारा बासमती तांदूळ आणि सफरचंद यावर रासायनिक फवारणी केल्याचे कारण सांगून परत पाठवत आहेत. त्याबाबतदेखील मोदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली नाही. आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिका मोठ्या प्रमाणावर कर लावत आहे. त्यावर सुद्धा मोदी गप्प आहेत. या कार्यक्रमातून भारतात किती गुंतवणूक आली, हे मोदींने जाहीर करावे. अन्यथा, हा कार्यक्रम केवळ मोदींचा वैयक्तिक दौरा होता असेच समजावे लागेल, असेही वल्लभ यांनी सांगितले.

Intro:पीएमसी बँक मागील वर्षापर्यंत 100 कराेड रुपये फायद्यात हाेती. 23 ते 25 सप्टेंबर या काळत असं काय घडलं की या बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदारांवर निर्बंध लादले गेले. या बँकेवर घातलेले निर्बंध म्हणजे नोटबंदीची पुनरावृत्ती असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली..पुण्यात आज आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माेहन जाेशी आदी उपस्थित हाेते. Body:गौरव वल्लभ म्हणाले, लाेकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व बँक बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळाेवेळी सूचना देत असते, पीएमसी बँकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही? या बँकेच्या संचालक मंडळात गेल्या 13 वर्षांपासून भाजपाच्या एका खासदाराचा मुलगा आहे, त्यामुळे या बँकेच्या व्यवहारांवर शंका येते. बँकेवर घातलेले निर्बंध ही एक प्रकारची नाेटबंदीची पुनरावृत्ती आहे. खातेदारांना महिन्याला 10 हजार रुपये काढता येतील ही घातलेली अट मागे घेण्यात यावी. तसेच सगळ्या संचालकांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी काँग्रेसची मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले..Conclusion:हाऊडी माेदी कार्यक्रमावर टीका करताना वल्लभ म्हणाले, हाऊडी माेदी कार्यक्रमामधून भारताला काहीच मिळाले नाही. एच 1 व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत माेदी ट्रॅम्प यांच्याशी काही बाेलले नाहीत. भारतातून निर्यात हाेणारा बासमती तांदूळ आणि सफरचंद यावर रासायनिक फवारणी केल्याचे कारण सांगून परत पाठवत आहे, त्याबाबत देखील माेदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली नाही. आयात हाेणाऱ्या वस्तूंवर अमेरिका माेठ्याप्रमाणावर कर लावत आहे त्यावर सुद्धा माेदी गप्प आहेत. या कार्यक्रमातून भारतात किती गुंतवणूक आली हे माेदींने जाहीर करावे. अन्यथा हा कार्यक्रम केवळ माेदींचा वैयक्तिक दौरा होता असेच समजावे लागेल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.