पुणे - कर्जबाजारीपणामुळे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिकाने छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिलिंद उर्फ बळवंत मराठे (60), असे सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर कर्मचाऱयांनी मिलिंद मराठे यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिलिंद मराठे हे प्रसिद्ध व्यवसायिक असून लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे मराठे ज्वेलर्स हे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी ते दुकानात असताना त्यांच्या दुकानातून अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर आवाज ऐकून दुकानातील कर्मचारी तिकडे गेले असता ,मराठे यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आर्थिक अडचणीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे मराठे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघातात आठ ठार; धुक्यामुळे झाली दुर्घटना..