पुणे - माळशेज घाटाजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर शिवजयंती निमित्ताने आलेल्या 20 वर्षीय तरुणीचा किल्ल्याच्या बुरुजावरुन पडून झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. सिध्दी सुनील कामठे (वय - २०) असे मृत तरूणीचे नाव आहे.
सिध्दी ही दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे हडसर किल्ल्यावर स्वछता अभियान राबवून शिवजयंती साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सिद्धी आपल्या 34 सदस्यांसोबत चिंचपोकळी मुंबई येथून आली होती. सकाळी ९ वाजताच्या सुमारास किल्ले हडसरवर स्वच्छता करत पोहोचण्याचा त्यांचा मानस होता. सिद्धीला अनेक ट्रेकचा अनुभव आहे. यावेळी ती हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा घेऊन नेतृत्व करत होती. तिच्या सोबत पल्लवी नावाची मैत्रिणही होती. एक एक करत ती पल्लवी सोबत किल्ल्याची वाट चढत होते. चढाई करून आता ती तटबंदीची भिंत ओलांडणार होती. मात्र, याचवेळी हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा स्वत:कडे ठेवत प्रतिमेला पुजन करण्यासाठी असलेली पिशवी ती पल्लवीकडे देताच तिचा पाठीमागे अचानक तोल गेला. यानंतर ती क्षणात हातात भगवा झेंडा घेऊन ती घरंगळत ४५० फुट खाली कोसळली. यात तिचा मृत्यु झाला.
हेही वाचा - टिकटॉकवरील 'स्कल ब्रेकर चॅलेंज' ठरतेय धोकादायक, सांगलीत विद्यार्थी जखमी
स्थानिक नागरिक, पर्यटक, शिवभक्तांच्या मदतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिचा जागीच मृत्यु दरम्यान, पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.