पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सिंगापूरच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या टेरेसवर गार्डन (garden to be built on terrace of Zilla Parishad) उभारण्यात येणार आहे. यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. Terrace Garden
सध्या वाढत असलेले प्रदूषण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एक पाऊल (step towards environmental protection) म्हणून जिल्हा परिषदेच्या टेरेसवर गार्डन उभारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. जिल्हा परिषदेत जे प्रदूषण होते, ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या टेरेस वर सावली येत आहे; अश्या टेरेस वर हे गार्डन उभारण्यात येणार आहे, असं यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
आज पर्यंत जमिनीवर गार्डन बघितल आहे. पण आत्ता टेरेस वर देखील गार्डन उभारले जात आहे. आणि हे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे टेरेस गार्डन उभारण्यात येणार आहे,असं देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
शहरात शेती करायला जागा उरली नाही आणि विषमुक्त-रसायनमुक्त भाजीपाला घराच्या अंगणातच उपलब्ध व्हावा, यासाठी टेरेस गार्डनची संकल्पणा उद्यास आली. तर शहरात अधिकाअधिक जागा ही घरांनी व्यापली असल्याने, टेरेसवर बगीचा तयार करणे सुरु झाले. घरावरील टेरेसवर फळे, भाजीपालाची लागवड करुन, सेंद्रिय पध्दतीने शेती केली जाते. Terrace Garden