ETV Bharat / state

बाबो! पुण्यात फळांच्या ट्रकमधून गांजाची तस्करी; ३.७५ कोटींचा १८७८ किलो गांजा जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने पुणे-सोलापूर रस्त्यावर कारवाई करत तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा १८७८ किलो गांजा जप्त केला आहे.

ganja worth Rs 3.75 crore seized in Pune district, 6 held
बाबो! पुण्यात फळांच्या ट्रकमधून गांजाची तस्करी; 3.75 कोटींचा 1878 किलो गांजा जप्त
author img

By

Published : Jul 17, 2021, 1:52 AM IST

Updated : Jul 17, 2021, 2:05 AM IST

पुणे - महसूल गुप्तचर संचालनालयाने गांजाची तस्करी करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारवाई करत तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा १८७८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गांजा तस्करीविरोधात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

ही आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

अभिषेक घावटे, विनोद राठोड, विलास पवार, धर्मराज शिंदे, श्रीनिवास पवार आणि राजू गोंधवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साफळा रचून केली कारवाई
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांना पुणे-सोलापुर महामार्गावरून फळांच्या ट्रकमधून गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार १५ जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचला होता. यादरम्यान त्यांनी संशयास्पद असणारा आयशर ट्रक आणि एक कार पकडली.

फळांच्या खाली गांजाची पोते

आयशर ट्रकमध्ये अननस आणि फणस होते. या फळांच्या खाली तब्बल ४० पोत्यांमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा गांजा जप्त करून आयशर ट्रकमधील दोन आणि कार मधील चार अशा एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तस्करांनी भन्नाट शक्कल लढवली होती. पण पोलिसांनी त्यांचे पितळ उघडे पाडले.

आंध्र प्रदेशमधून आणला गांजा

आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी हा गांजा आंध्र प्रदेशातून आणला असल्याचे कबुली दिली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे युनिटने ही कारवाई केल्याने गुन्हेगारांचे आणि अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, जून २०२० मध्ये पुणे कस्टम विभागाने अशीच मोठी कारवाई केली होती. यात पुण्यामध्ये गांजा आणि चरसची तस्करी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. तसेच या कारवाईत २ कोटी १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल ८६८ किलो गांजा आणि ७.५ किलो चरस जप्त करण्यात आला होता.

हेही वाचा - नाना पटोले यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे -दिलीप वळसे पाटील

हेही वाचा - राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत यावे - आठवले

Last Updated : Jul 17, 2021, 2:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.