पुणे: विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड येथे 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या आयोजित कार्यक्रमामध्ये मोबाईल चोरी होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होती. या अनुषंगाने पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी तपास करून 5 जणांना अटक केली आहे. हे सगळे चोर विमानाने पुण्यामध्ये येऊन महागडे फोन चोरी करण्याच्या तयारीत होते.
पोलीसांनी केले अटक: या प्रकरणी पोलीसांनी असद गुलजार महंमद वय ३२ वर्षे रा ११६५ सोनारवाली रोड कलामहल उंचा छलान दिल्ली, निजाम बाबु कुरेशी वय ३५ वर्षे रा. १०६ जवाहर पार्क शालीमार गार्डन साहिबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश, शाहबाज भोले खान वय २६ वर्षे रा गल्ली नं १ कबीर नगर महादेव मंदीराशेजारी दिल्ली, राहुल लीलीधर कंगाले वय ३० वर्षे रा बी१ / १५१ डी.एल.एफ कॉलनी भोपरा साहीबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश, नदीम इब्राहिम मलीक ४० वर्षे रा सी / ११२ / २० गल्ली नं १९ नॉर्थ गोंडा यमुनानगर शेजारी दिल्ली यांना अटक केली आहे.
पाठलाग करून पकडले: पोलीसांना जेव्हा तक्रार प्राप्त झाली, तेव्हा तपास पथकातील स्टाफ हे त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना एक संशयित इसम दिसला. त्यास थांबण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जावु लागला. त्यावेळी पोलीस अंमलदार थोपटे व बर्डे यांनी सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास पकडले. तेव्हा त्याने त्याचे नाव असद गुलजार महंमद रा. दिल्ली असे असल्याचे सांगितले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याने आम्ही व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या कार्यक्रमामध्ये मोबाईल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथुन आलो आहे. माझे साथीदार हे मिलन हॉटेल, पुणे स्टेशन येथे आहेत असे सांगितले.
५ मोबाईल फोन हस्तगत केले: पोलिसांनी मिलन हॉटेल पुणे स्टेशन येथे जाऊन चार इसमांना ताब्यात घेतले. यांच्याकडून एकुण २८,४०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ३९ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये मोबाईल फोन चोरी करणारा इसम प्रशांत के. कुमार, मु.पो. भोवी कॉलनी ता. भद्रावती शिमोगा राज्य कर्नाटक यास सुध्दा विमानतळ पोलीस स्टेशन तपास पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकुण १,८७,०००/- रुपये किंमतीचे एकुण ५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकुण ३०,२७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे करत आहेत.
हेही वाचा: Pune Crime प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरणकुटुंबीयांना दिली ठार मारण्याची धमकी दोघांना अटक