पुणे Gangster Sharad Mohol shot Dead : नामवंत शैक्षणिक संस्थांमुळं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. मात्र, याच पुण्यात खून, बलात्कार, गँगवॉर अशा घटना वाढत आहेत. शुक्रवारी (5 डिसेंबर) गुंड शरद मोहोळवर अज्ञातांनी गोळ्या झाडल्यामुळं पुन्हा एकदा पुण्याची वाटचाल गँगवॉरच्या दिशेनं होताना दिसतेय. मात्र, या गँगवॉरची सुरुवात नेमकी कधी झाली? पुण्याचं गुन्हेगारी विश्व कसं वाढत गेलं? त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत.
अशी झाली गुन्हेरागीची सुरुवात : सन 2000 मध्ये पुण्यात आयटी उद्योगानं शिरकारव करायला सुरुवात केली होती. त्यामुळं पुण्यात जमिनीला जरा जास्तच किंमत आली होती. जमिनींनी जास्तचा भाव खायला सुरुवात केली होती. आयटी क्षेत्राच्या आगमनानंतर पुण्याचा विकास झपाट्यानं होत होता. तसंच पुण्याच्या आसपासच्या गावतील जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त भाव आला होता. यातून काही जण जमीन विकून एका रात्रीत मालामाल झाले होते. यातून जमिनीचा व्यवहार क्लिअर करून देण्यासाठी पुण्यात भाईगिरी उदयास आली. इथंच पुण्याच्या गुंडगिरीची सुरुवात झाली. जमिनीतून मिळालेल्या बक्कळ पैशामुळं गळ्यात सोन्याची चैन, महागाड्या गाड्या, घडाळं तरुणांच्या मनगटांवर दिसू लागली. त्यामुळं पुण्यातील गुन्हेगारीकडं तरुण पिढी आकर्षित झाली.
पुण्यात रक्तरंजीत गुन्हेगारी : कॉर्पोरेट कंपन्यांना लागणारी जमीन शोधणं, जमीन मालकांवर दबाव टाकणं, जमिनीची कागदपत्रं बनवणं, एखाद्याला धमकावणं अशी काम सुरुवातीला पुण्यातील टपोऱ्या पोरांनी करायला सुरुवात केली. यातुनच पुढं पुण्यात रक्तरंजीत गुन्हेगारी पुढं आली. 2006 मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळची हत्या करण्यात आली होती. ही हत्या बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळनं केली होती.
गँगवॉरची सुरुवात : याच काळात पुण्यात प्रकाश हरिभाऊ उर्फ अप्पा लोंढे तरुणाची गुन्हेगारी विश्वात चर्चा होत होती. त्याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, अवैध वाळू उपसा असे 65 गुन्हे दाखल होते. 2004 मध्ये अप्पा लोंढेवर पुणे पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करत त्याला तुरुंगात पाठवलं होतं. तुरूंगातून सुटल्यानंतर अप्पा लोंढे पुन्हा पुण्यात सक्रिय झाला होता. त्यामुळं 2015 मध्ये पुण्याच्या उरळी कांचनमध्ये अप्पा लोंढेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तेव्हा, हत्तेनंतर उरळी कांचन भागात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळं भीतीपोटी अनेक दुकानदारांनी पटापट दुकानं बंद केली होती. येथूनच पुढं गँगवॉरची सुरुवात झाली.
मारणे विरुद्ध मोहोळ गँगवॉर : सुधीर रसाळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मारणे गँगनं संदीप मोहोळची हत्या केली. त्यामुळं दोन्ही गँगमधील संघर्ष अधिकच पेटला. संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळनं 2010 मध्ये किशोर मारणेची हत्या करून बदला घेतला होता. या हत्येप्रकरणी न्यायालयानं शरद मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
शरद मोहोळची हत्या : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर 5 जानेवारी 2024 ला गोळीबार करुन हत्या करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एक आरोपी निष्पन्न झालाय. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असं या आरोपीचं नाव आहे. पोळेकर यानं त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार केला. त्यानंतर त्याला सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याचवेळी ससून रुग्णालयात देखील दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा -