पुणे - येथील पिंपरी-चिंचवडमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीचे रिक्षातून अपहरण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पीडित २१ वर्षीय तरुणीने निगडी पोलिसात अज्ञात तिघांविरोधात तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यानुसार निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - ठाण्यात चुनाभट्टी बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा मेणबत्ती मोर्चा
शुक्रवारी पीडित तरुणी महाविद्यालयात जात होती. निगडीच्या टिळक चौक येथून एकटी जात असताना अचानक पुण्याच्या दिशेकडून आलेल्या रिक्षातून अज्ञात तीन जण आले. त्यांनी संगनमत करुन त्यातील एका इसमाने पीडित तरुणीच्या तोंडाला रुमाल बांधून रिक्षात बसवले. तिचे अपहरण केल्यावर तिला गुंगीचे औषध देऊन अज्ञात स्थळी नेले आणि याचा फायदा घेऊन तीन अज्ञात इसमांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. अशी तक्रार तिने निगडी पोलिसात दिली आहे. त्यानुसार निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरण : दीड दिवसानंतरही युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार