ETV Bharat / state

CCTV : वर्गणीच्या नावाखाली गुंडांची दहशत, हॉटेल चालकाला बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ - Hotel owner brutally beaten

पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात गुंडांच्या माध्यमातून देवीच्या वर्गणीच्या नावाखाली दहशत माजवली जात आहे. विशेष म्हणजे या टोळीकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात ( Hotel owner brutally beaten ) आली. या संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाले ( Thrilling incident captured in CCTV ) आहे. असे असले तरी अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.

Navratri donation issue
वर्गणीच्या नावाखाली गुंडांची दहशत
author img

By

Published : Sep 30, 2022, 10:36 AM IST

पुणे - पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण हे पुन्हा एकदा डोके वर काढू लागले ( Crime rate increased in Pune ) आहे. पुणे शहरात आठवड्याभरात चार हून अधिक खुनाचा गुन्हा दाखल असताना पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात गुंडांच्या माध्यमातून देवीच्या वर्गणीच्या नावाखाली दहशत माजवली जात आहे. विशेष म्हणजे या टोळीकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात ( Hotel owner brutally beaten ) आली. या संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाले ( Thrilling incident captured in CCTV ) आहे. असे असले तरी अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.

वर्गणीच्या नावाखाली गुंडांची दहशत

बळजबरीने वर्गणी मागण्याचा प्रयत्न - मनीष मारणे अस हॉटेल चालकांचे नाव आहे. रविवार मार्केटयार्ड गंगाधाम चौक येथे गारवा बिर्याणी हॉटेल ( Navratri donation issue in pune ) आहे. या हॉटेल वर दोन जणांनी बळजबरीने वर्गणी मागण्याचा प्रयत्न केला तसेच हॉटेल मालकांनी त्यांना वर्गणी संदर्भात स्वइच्छेने वर्गणी देतो असे सांगितले. पण ते वर्गणीदार त्यांना म्हणाले देवीची वर्गणी (खंडनी) पिंदु भाऊ दुधानी यांच मंडळ आहे. तुम्हाला पैसे ध्यावे लागतील म्हणून वाद घालून होटेल मालकास व कामगारांस मारहान करून त्यांचे पैसे व आयफोन मोबाईल चोरून घेऊन गेले.

मारून टाकण्याची धमकी - त्यानंतर हॉटेल मालकाचा भाऊ तो मोबाईल आणण्यासाठी मार्केटयार्ड भुसारबाजार गेट नं.९ येथे गेला व त्यांना मोबाईल मागीतला असता. सुनिल दुधानी व त्याचा भाऊ रोहित अवतारसिंग दुधानी व इतर पाच ते सहा जणांनी त्याच्या अंगावर फोर विलर लाल रंगाची गाडी घालुन जोरात धडक देऊन उडवले तो खाली पडुन जखमी झाल्यावर या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याला दगड़, दांडक्यांनी मारून तेथुन पळून गेले. त्यानंतर जखमी असलेल्या त्या व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी मदत करून पुणे, एडवांटेस हॉस्पिटल येथे उपचारा साठी नेले . तेथेही. अवतारसिंग दुधानी. हिंदूसिंग दुधानी. रोहीत दुधानी व इतर १० ते१५ लोक जावुन जखमी अवस्थेत असलेल्या दोधाभावांना धमकी दिली तुम्ही जर पोलीस तक्रार केली तर तुम्हास जिवे मारून टाकू .

पुन्हा दहशत पसरण्याचा प्रयत्न - परत रात्री साधारण ११:३० च्या दरम्यान हे गुन्हेगार लोक हॉटेल परिसरात व जखमी दोघे भाऊ राहत असल्याच्या ठिकाणी (हमाल नगर मार्केट यार्ड) येथे हत्यारे घेऊन जाऊन दहशत पसरण्याचा प्रयत्न केला. नंतर तिन ईसम पल्सर गाडीवर येऊन गारवा बिर्याणी हॉटेलचा असलेला कॅमेरा तोडून चोरून नेला व सीसी फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जखमी भावांच्या नातेवाईकांना एका हॉटेलला बोलवुन दमदाटी करुन आमची काही तक्रार नाही. आमचे आपअपसात मिटले आहे. असे पो. स्टेशन ला जावुन सांगा नाही तर वाईट होईल आम्ही काय गुन्हेगार आहोत. आमचे कोण वाईट करू शकत नाही.अस सांगितल. अश्याप्रकारे हे मार्केटयार्ड (भुसार बाजार) आंबेडकर नगर, गंगाधाम चौक परिसरात रोज दहशत करत आहे.अशी या हॉटेल चालकांची तक्रार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.