पुणे - दिवेघाटात नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला निघालेल्या दिडीला झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (वय-36) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आळंदीत दर्शनासाठी विष्णु मंदीरात ठेवण्यात आले होते. इंद्रायणी घाटावर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज रात्री साडे आठ वाजता इंद्रायणी घाटावर आग्नि देण्यात आला.
हेही वाचा - दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार
देवाची आळंदी संजीवन समाधी सोहळा साजरा होत असताना या सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक आळंदीत दाखल होत आहेत. मात्र, मंगळवारी (आज) घडलेल्या घटनेमुळे वारकऱ्यांवर शोककळा पसरली. आळंदीमध्ये होऊ घातलेल्या संजीवन समाधी सोहळ्याला आलेल्या प्रत्येक वारकऱ्याने विष्णू मंदीरात येऊन सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
दिवेघाटातून नामदेव महाराजांची पालखी आळंदीच्या दिशेने येत असताना घाटामधील बुल्डोजर नामदेव महाराजांच्या दिंडीत शिरल्याने अपघात झाला होता. यामध्ये नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा अपघाती मृत्यु झाला होता. वारीच्या काळात वारकरी दिड्यांना कुठल्याच प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही. पुढील काळात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.
हेही वाचा - पीएमसी प्रकरण : तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी ठेवीदारांना मिळू शकतात १ लाख रुपये