ETV Bharat / state

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने मित्राने केली मैत्रिणीला मारहाण - हिंजवडी तरुणी माराहाण

हिंजवडीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे. योगेश्वर शशिकांत पगारे (वय 25) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

Hinjewadi Police station
हिंजवडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jan 11, 2022, 7:18 PM IST

पुणे - हिंजवडीत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे. योगेश्वर शशिकांत पगारे (वय 25) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार, हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला होता.

हेही वाचा - Makar Sankrant Special : हलव्याच्या दागिन्यांनी सजली पुण्याची बाजारपेठ!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून आरोपी योगेश्वर आणि 25 वर्षीय मैत्रीण हे दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यांचे चांगले मैत्रीचे संबंध होते. परंतु, दिनांक सहा जानेवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास योगेश्वर ने 25 वर्षीय मैत्रिणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मला तुझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा, मैत्रिणीने नकार दिला. याचा राग मनात धरून योगेश्वरने नॉन स्टिक तव्याने मैत्रिणीला बेदम मारहाण केली. यात, ती जखमी झाली होती.

अखेर दिनांक 10 जानेवारी रोजी संबंधित घटनेची माहिती तरुणीने तिच्या आई वडिलांना दिली. मग ते पिंपरी - चिंचवड शहरात आल्यानंतर हिंजवडी पोलिसात योगेश्वर विरोधात तक्रार दिली. त्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे, अशी माहिती महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी सांगितली.

हेही वाचा - Pune Corona Update : पुण्यात आज 3067 रुग्णांची नोंद, तर 2 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.