ETV Bharat / state

संतापजनक! शेजारी राहणाऱ्या 70 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार

घराजवळच राहणाऱ्या एका 70 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

बालिकेवर अत्याचार
बालिकेवर अत्याचार
author img

By

Published : Jun 9, 2021, 1:54 PM IST

पुणे - कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. घराजवळच राहणाऱ्या एका 70 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. पीडित बालिकेच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आला आहे. 38 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नराधम आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.

मागील दोन महिन्यांपासून सुरू होता हा प्रकार

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच परिसरात राहतात. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. आरोपीने फिर्यादीच्या दहा वर्षीय बालिकेला पैसे देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मुलीचे आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान सोमवारी देखील आरोपीने पीडित बालिकेला बोलावून तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार सुरू केला होता. त्यानंतर अचानक मुलीची आई आल्याने, हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटकही केली आहे. कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा - खळबळजनक! जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले २ मैत्रिणींचे मृतदेह, शवविच्छेदन अहवालानंतर सत्य येणार समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.