पुणे : याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राहुल हा भारतीय लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होता. यावेळी त्याची ओळख आरोपी प्रमोद यादव याच्याशी झाली. तेव्हा तो फिर्यादी याला आर्मीचा युनिफॉर्म परिधान करून भेटला आणि भारतीय लष्करात नोकरी लावून देतो, असे सांगितले. फिर्यादीने परीक्षेचे कारण देत वेळोवेळी पैश्यांची मागणी केली. तसेच परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यावे लागेल त्याची तयारी करावी लागेल असे खोटे मार्गदर्शन देखील केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून फसवणूक : आरोपी हा मूळचा नाशिक येथील असून तो काही वर्षांपासून पुण्यातील कोंढवा येथे राहत आहे. त्याने फिर्यादी राहुल याला कोंढवा येथेच राहत्या घरी भेटायला बोलावले आणि त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचेदेखील वेळोवेळी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, भारतीय लष्करात नोकरी लावून देतो या प्रकरणात १०० हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
अखेर तक्रार दाखल: आरोपी प्रमोदने फिर्यादी राहुलचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये 7 ते 8 डमी अधिकारी उभे देखील केले. हे प्रकरण सप्टेंबर 2022 पासून ते 18 जून 2023 पर्यंत सुरू होते. या दरम्यान आरोपीने फिर्यादीकडून जवळपास 28 लाख 88 हजार रुपये उकळले. एवढे दिवस झाले आणि एवढे पैसे देऊन काहीही होत नाही. म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राहुलने कोंढवा पोलीस ठाणे येथे याबाबत तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
46 लाख रुपयांनी गंडविले: याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, आम्हाला याबाबत माहिती मिळाली की भारतीय लष्करात भरतीसाठी एकजण पैसे घेत आहे. तसेच ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, असे 13 लोक आमच्या समोर आले. हे सर्व ग्रामीण भागातील सातारा, औरंगाबाद, धुळे, नाशिक या भागाचे आहेत. हा आरोपी प्रत्येक जणांकडून 90 हजार ते साडे चार लाख रुपये भारतीय लष्करात भरतीसाठी घ्यायचा. तुम्ही आर्मीमध्ये सिलेक्ट झाले अशी फेक मेरिट लिस्ट हा तरुण फिर्यादी यांना द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. आरोपीने आतापर्यंत 13 लोकांची फसवणूक केली असून जवळपास 46 लाख रुपयांनी गंडविले आहे.
हेही वाचा:
- समीर वानखेडे यांना 28 जून पर्यंत कारवाईपासून संरक्षण, शाहरुख खानला पक्षकार बनवण्याची मागणी
- Attacked On Senior Citizen: दोन बहिणींकडून शेजारच्या ज्येष्ठ नागरिकाच्या गुप्तांगावर प्रहार; जाणून घ्या कारण...
- Satara Suicide News : साताऱ्यात नवविवाहित तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून आत्महत्या