ETV Bharat / state

परिवहन कार्यालयातील एजंटांच्या मदतीने भावानेच केली भावाची फसवणूक - भावानेच केली भावाची फसवणूक

एकीकडे देशात परिवहन विभागाने चांगले व पारदर्शक काम करावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे याच परिवहन कार्यालयात एजंटांच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Sep 20, 2019, 4:41 PM IST

Updated : Sep 20, 2019, 9:43 PM IST

पुणे - परिवहन कार्यालयातील एजंटांच्या मदतीने भावानेच भावाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाला व्यवसाय करता यावा, यासाठी दुसऱ्या भावाने त्याला टेम्पो खरेदी करुन दिला. मात्र, त्या भावाने टेम्पोच्या मूळ मालकाच्या सहमतीशिवाय तो टेम्पो विकला.

संबंधित घटनेची माहिती देताना तक्रारदार आणि परिवहन अधिकारी

हेही वाचा - मुंबईत गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणारा रिक्षाचालक गजाआड

सचिन गव्हाणे (रा. राजगुरुनगर) यांनी टेम्पो विकत घेऊन भावाला चालवण्यासाठी दिला. मात्र, अचानक भावाने टेम्पो विकला आणि पळून गेला. हे प्रकरण लक्षात येताच सचिनने टेम्पोच्या विक्रीची चौकशी केली आणि माहितीच्या अधिकारात सर्व व्यवहाराची माहिती मागवली. त्यात भावाने परिवहन कार्यालयात अधिकारी आणि दलालांच्या मदतीने ट्रकची विक्री केल्याचे समोर आले. सचिनने यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिवहन कार्यालय आणि पोलीस यांच्यापैकी कोणीही याची दखल घेतली नाही, असा आरोप त्याने केला आहे.

हेही वाचा - ऑनलाईन खरेदी करताना सावधान..!

एकीकडे देशात परिवहन विभागाने चांगले व पारदर्शक काम करावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे याच परिवहन कार्यालयात एजंटांच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा प्रकरणाकडे गडकरी कसे पाहणार हाही एक प्रश्नच आहे. दरम्यान, याबाबत उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. आता ही चौकशी किती दिवस चालणार असा प्रश्न सचिनने विचारला आहे.

Intro:Anc_स्वताच्या मालकीची वस्तू परस्पर विकुन संपत्ती जमीन यांची विक्री करून फसवणुक केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. काहीवेळी लाच देऊन किंवा फसवणूक करून दुसऱ्याची वस्तू, जमीन हडपण्याचे प्रकार होतात. आता उत्तर पुणे जिल्ह्यातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भावानेच भावाची फसवणुक करत चारचाकी ट्रकची मुळ मालकाच्या सहमतीशिवाय परिवहन कार्यालयानं विक्रीची परवानगी दिली.

राजगुरूनगर इथं राहणाऱ्या सचिन गव्हाणे यांनी टेम्पो विकत घेऊन टेम्पो भावाला चालवण्यासाठी दिला होता. मात्र, अचानक भावानं टेम्पो विकला आणि पळून गेला. हे प्रकरण लक्षात येताच सचिनने टेम्पोच्या विक्रीची चौकशी केली तेव्हा धक्कादायक हा प्रकार समोर आला.

सचिनने माहितीच्या अधिकारात सर्व व्यवहाराची माहिती मागवली. त्यात भावाने परिवहन कार्यालयात अधिकाऱी आणि दलालांच्या मदतीनं ट्रकची विक्री केल्याचं समोर आलं. सचिनने यानंतर पोलीसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र परिवहन कार्यालय आणि पोलीस यांच्यापैकी कोणीही याची दखल घेत नसल्याचा आरोप त्याने केला आहे.

Byte__सचिन गव्हाणे__ट्रक मालक

Byte_आनंद पाटील_उपप्रादेशिक अधिकारी

Vo_एकीकडे देशात परिवहन विभागाने चांगलं व पारदर्शक काम करावं यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंबर कसली आहे तर दुसरीकडे याच परिवहन कार्यालयात एजंटांच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांची फसवणुक होत आहे त्यामुळे अशा प्रकरणाकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कसं पहाणार हाही एक प्रश्नच आहे दरम्यान, याबाबात उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील ह्यांना विचारलं असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे म्हटलं आहे. आता ही चौकशी किती दिवस चालणार असा प्रश्न सचिनने विचारला आहे.Body:...Conclusion:
Last Updated : Sep 20, 2019, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.