ETV Bharat / state

Accident on Pune-Mumbai Highway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारची ट्रकला धडक; अपघातात चार जणांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 9, 2022, 6:18 PM IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात (Accident on Mumbai-Pune Highway) झाला असून, यात चार जणांचा मृत्यू (Four Death in Road Accident) झाला आहे. ही घटना आज (9 एप्रिल) दुपारी सव्वा चारच्या सुमारास गहुंजे क्रिकेट स्टेडियमच्या समोर घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली.

car truck accident
कार ट्रक अपघात

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात (Accident on Mumbai-Pune Highway) झाला असून, यात चार जणांचा मृत्यू (Four Death in Road Accident) झाला आहे. ही घटना आज (9 एप्रिल) दुपारी सव्वा चारच्या सुमारास गहुंजे क्रिकेट स्टेडियमच्या समोर घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

car truck accident
कार ट्रक अपघात

ट्रकला पाठीमागून कारची धडक - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरात धडक दिली. यात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. स्कोडा कंपनीची ही कार चालक अतिशय सुसाट वेगात चालवत होता. मुंबईच्या दिशेने जात असतानाच गहूंजेच्या क्रिकेट स्टेडियम समोरच एक ट्रक बंद अवस्थेत होता. मार्गाच्या बाजुला असलेल्या या ट्रकच्या खाली ही कार शिरली. 50 मीटरपासूनच ब्रेक लावल्याने चाकाचे व्रण मार्गावर स्पष्ट दिसत होते. यावरून कार अतिशय सुसाट वेगात असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय ही धडक इतकी जोराची होती की कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.