ETV Bharat / state

धक्कादायक... 40 वर्षीय महिलेच्या मृतदेहाची तीन दिवस हेळसांड; माजी सरपंचाच्या मदतीने महिलेवर अंत्यसंस्कार

कारेगाव येथे वास्तव्यास असणारी 40 वर्षीय महिला 15 दिवसांपासून आजारी होती. कारेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अचानक प्रकृती खालावल्याने महिलेला शिक्रापूर येथील दुस-या खाजगी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. मात्र,त्याठिकाणी या महिलेचा मृत्यू झाला. तीन दिवसानंतर कारेगावच्या माजी सरपंचाने पोलीस,नातेवाईक, ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या मदतीने मृत्यदेहावर अंत्यसंस्कार केले.

author img

By

Published : Aug 2, 2020, 11:22 AM IST

funeral after three days of death
तीन दिवसानंतर महिलेवर अंत्यसंस्कार

शिरुर (पुणे) - कोरोना महामारीच्या काळात व्यक्तीच्या मृत्यू नंतरही वेदना संपत नाहीत. शिरुर तालुक्यातील खारेगाव येथे 40 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कोरोना तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत मृतदेह 3 दिवस रुग्णवाहिकेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसानंतर महिलेच्या मृत्यूनंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर कारेगावच्या माजी सरपंचाने पोलीस,नातेवाईक, ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या मदतीने मृत्यदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, या घटनेकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मूळचे तुळजापूर येथील मात्र कारेगाव येथे वास्तव्यास असणारी 40 वर्षीय महिला 15 दिवसांपासून आजारी होती. कारेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अचानक प्रकृती खालावल्याने महिलेला शिक्रापूर येथील दुस-या खाजगी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणी या महिलेचा मृत्यू झाला. महिलेला कोरोनाची लागण झाली का याची तपासणी करण्यासाठी स्वँब घेण्यात आले. मात्र, तीन दिवसांपर्यत तपासणी अहवाल न आल्याने मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेची माहिती कारेगावचे माजी सरपंच यांना मिळताच काल रात्री नातेवाईक,पोलीस व ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र,या गंभीर प्रकाराकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कोरोनामुळे माणसातील माणुसकी हरपली की काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. त्यातच मृत्युनंतर मृतदेहाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी हेळसांड केली जात असल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.