पुणे : राज्य वक्फ बोर्डांची कामगिरी निराशाजनक ( performance State Waqf Board is disappointing ) असून, हे मुस्लिम समाजासाठी चिंतेचे कारण बनले आहे. ज्या उद्देशासाठी बोर्डाची स्थापन करण्यात आली. त्याचीच पूर्तता केली नाही, अशी खंत माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री के. रहमान खान ( Former Union Minority Minister K Rahman Khan ) यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली.
अधिकाराचा वापर का होत नाही - पुणे येथील कॅम्प परिसरात आझम कॅम्पस येथे अंडरस्टैंडिंग ट्रू नेचर एंड मैनेजमेंट ऑफ औकाफ फॉर बेटर प्रोटेक्शन, परफॉरमेंस एंड डेवलपमेंट’ या दोन दिवसीय राष्ट्रीय वक्फ परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून खान बोलत होते. वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढले जाऊ शकते. कायद्याने राज्य मंडळांना अतिक्रमण काढण्याचे अधिकार दिले आहेत; परंतु वक्फ बोर्ड आपल्या अधिकाराचा वापरत का करत नाही, हा मोठा प्रश्न आहे. मुतवल्लींसह (काळजी घेणार्या) मंडळाचे सदस्य आपापसातील भांडणात वेळ घालवत आहेत. परिमाणी ज्यामुळे मंडळाच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने मंडळाचे कमकुवत झाले आहे, असे खान म्हणाले.
समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिक्षणाला चालना - महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन अँड टास्क फोर्सचे (एमडब्ल्यूएलपीटी) सल्लागार यांनी वक्फ प्रकरणांमध्ये मुस्लिम समाजाच्या अनास्थेबद्दल शोक व्यक्त केला. समाजाच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, रुग्णालये, शाळा, कौशल्य विकास केंद्रे, दवाखाने यांच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे, असे मत इन्कम टॅक्सचे माजी मुख्य आयुक्त अकरमुल जब्बार खान यांनी व्यक्त केले.
मुस्लिमांच्या जीवनात परिवर्तनीय बदल - मुस्लीम समाजाच्या पायाभूत काम, स्वारस्याच्या अभावामुळे हजारो एकर वक्फ जमीन गमावली आहे. जोपर्यंत समुदाय मोठ्या संख्येने बाहेर पडत नाही, तोपर्यंत वक्फ जमीन मुक्तीच्या कामाला गती मिळणार नाही. विकासाच्या माध्यमातून देशातील मुस्लिमांच्या जीवनात परिवर्तनीय बदल घडवून आणू शकतात, राष्ट्राचा विकास करू शकतात. समाजाची दुर्दशा दूर करण्यासाठी वक्फ जमिनीचा व्यावसायिक विकास करणे ही काळाची गरज असल्याचे ही अकरमुल जब्बार खान यांनी सांगितले.
वक्फवर विश्वास ठेवला पाहिजे - इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीज (आयओएस), नवी दिल्लीचे उपाध्यक्ष मोहम्मद अफझल वानी म्हणाले, वक्फ संस्था ही एका परिस्थितीतून विकसित झाली. प्रेषित मोहम्मद यांनी खलीफा उमर यांना दिलेल्या सल्ल्यानुसार वक्फ मालमत्ता बांधली पाहिजे. ती कायमस्वरूपी मिळाली पाहिजे, या मालमत्ता विकली जाऊ नयेत हे वक्फचे मूळ तत्वज्ञान आहे. ऑट्टोमन साम्राज्याच्या काळात, मुस्लिम मालमत्तेचा 2/3 भाग वक्फ होता. केवळ 1/3 भाग जनतेकडे होता कारण त्यांचा संस्थेवर विश्वास होता. त्यांना मालमत्तेची भीती वाटत नव्हती. आपण वक्फवर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते व्यवस्थापित करण्यासाठी चारित्र्य आणि कौशल्य निर्माण केले पाहिजे, त्यांनी सांगितले.
शिक्षणामुळे मोठा बदल - आयओएसचे सरचिटणीस प्रो झ.म. खान म्हणाले, वक्फचे लोकशाहीकरण इस्लामने केले आहे. जगात इतर कोणीही केले नाही. भारतीय मुस्लिमांना जमिनीवरील वास्तवाची जाणीव होत आहे. बदलत्या काळानुसार ते जागे झाले आहेत. ते झपाट्याने शहरीकरण स्वीकारत असून, स्त्रिया आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर माता बालशिक्षणासाठी अशी मोठी पावले उचलत असतील तर एक मोठा बदल घडू शकतो. ज्यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी वक्फ मालमत्तेचा वापर - एमडब्ल्यूएलपीटीचे अध्यक्ष सलीम मुल्ला म्हणाले, वक्फबाबत जनजागृती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी वक्फ मालमत्तेचा वापर करण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय वक्फ परिषदेसाठी भारतातील विविध क्षेत्रातील सुमारे 40 विचारवंत पुण्यात जमले आहेत.