ETV Bharat / state

Jaidev Gaikwad Supports : राष्ट्रवादीचे माजी आमदार जयदेव गायकवाड यांचे शाईफेक प्रकरणाला समर्थन

author img

By

Published : Dec 11, 2022, 6:02 PM IST

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक (supports throw ink) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन वेगवेगळ्या भूमिका दिसून येत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार जयदेव गायकवाड (Former NCP MLA Jaidev Gaikwad) यांनी या घटनेचे समर्थन केले आहे. Jaidev Gaikwad Supports

Jaidev Gaikwad Supports
गायकवाड यांचे शाईफेक प्रकरणाला समर्थन

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक (supports throw ink) प्रकरणाचा निषेध विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन वेगवेगळ्या भूमिका दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी या घटनेचे समर्थन केले आहे. तुम्ही महापुरुषांना काही म्हणाल तर, आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही जयदेव गायकवाड (Former NCP MLA Jaidev Gaikwad) यांनी दिला आहे. Jaidev Gaikwad Supports

निषेध आंदोलन : पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज विविध आंबेडकर संघटनेच्या वतीने, लाक्षणिक उपोषण करून चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांना अटक करावी या मागणीसाठी निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

निषेध करणाऱ्यांना पाठींबा : या आंदोलनावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड असे म्हणाले आहेत की, त्या व्यक्तीने केलेल्या निषेधाचा आम्ही समर्थन करतो. तुम्ही उद्या महापुरुषांना भिकारी म्हणणार, मुद्दाम महापुरुषांचा अपमान कराल तर, हे आम्ही होऊ देणार नाही, तुम्ही भीक मागितल्याचे समर्थन करून दिलगिरी व्यक्त करत आहे, ते सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे माझा या सर्व निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा असल्याचे जयदेव गायकवाड म्हणाले आहेत.

खपवून घेतले जाणार नाही : वादग्रस्त वक्तव्य करून त्यावर समर्थन करणे, ही भाजपाची मनोवृत्ती आहे आणि त्याचाच निषेध आम्ही करत आहोत. पक्ष संघटना विसरून सर्व आंबेडकरी संघटना याचा निषेध करत आहेत, चंद्रकांत दादा पाटलाने चूक केली आहे ,आणि त्याची शिक्षा भोगावी, त्यांनी आत्मक्लेष करावा, एक दिवस उपाशी राहावं. परंतु गुन्हा करायचा ,शिक्षा भोगायची नाही, वरून दमदाटी करायची, हे खपवून घेतले जाणार नसल्याचे माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी म्हणटले आहे. Jaidev Gaikwad Supports

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.