ETV Bharat / state

'मोदींवर टीका म्हणजे घटनेची पायमल्ली; प्रकाश आंबेडकर सुधरा, जमिनीवर या' - प्रकाश आंबेडकर सोलापूर प्रेस

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंंतप्रधान मोदी बाबत आक्षेपार्ह वक्यव्य केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार संजय काकडे यांनी टीकास्त्र सोडले आहे. तसेच पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीबाबतची टीका म्हणजे घटनेचे पायमल्ली असल्याचे काकडे म्हणाले.

BJP Leader sanjay kakade on ambedakar
माजी खासदार संजय काकडे
author img

By

Published : Oct 21, 2020, 7:02 AM IST

Updated : Oct 21, 2020, 7:43 AM IST

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल केला. मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला आहे. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्यांना हे शोभा देणारे नाही. प्रकाशजी हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाहीत, अशी टीका काकडे यांनी केली आहे.

पंतप्रधान पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची पायमल्ली करणारे आहे, अशा शब्दांत माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रकाश आंबेडकर हे सवंग प्रसिद्धी मिळणारी वक्तव्य करून राजकारण करीत आले आहेत. त्यांना अशी वक्तव्य करून स्टार व्हायचे आहे. परंतु, ते बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम न राहिल्यानेच जनतेने त्यांना नाकारले आहे.

'मोदींवर टीका म्हणजे घटनेची पायमल्ली - संजय काकडे

त्यांनी जमिनीवर यावे-

आतापर्यंत ते चारवेळा लोकसभेची निवडणूक हारले. तसेच विधानसभेतील निवडणुकीतही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. महापालिका, नगरपालिकांतही त्यांना विजय मिळवता आला नाही. प्रकाश आंबेडकर जमिनीवर नसल्याने सगळीकडे पराभूत झाले, त्यांनी जमिनीवर यावे. प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांच्या घराण्यातील असल्यानेच त्यांना मान मिळाला. मायावती बाबासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन गेल्या तर, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. परंतु, प्रकाश आंबेडकर सतत हार पत्करत गेले. राजकारणात जेव्हा प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन समोर येतील तेव्हाच जनता त्यांना स्वीकारेल.

रामदास आठवले बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात. त्यामुळे ते खासदार झाले, मंत्री झाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घटनात्मक पदांचा व राज्यघटनेचा सन्मान करावा, तेंव्हाच त्यांचाही लोक सन्मान करतील, अशी अपेक्षा असल्याचेही संजय काकडे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी दौरा केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषेदत पंतप्रधान मोदी यांनी देश विकायला काढलाय असे म्हणत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून संजय काकडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

Last Updated : Oct 21, 2020, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.