पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी काकडे म्हणाले की, पक्षात काही वाचाळवीर मंडळी आहे. अश्या लोकांवर सांस्कृतिक पक्ष असलेल्या आमच्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर बंदी आणावी. तसेच याबाबत मी वरिष्ठांना पत्र देखील पाठवत आहे. त्यांच्याकडे मागणी देखील करणार आहे. अश्या या वक्तव्याने काही समाज भाजपापासून दूर चालला आहे. यामुळे पक्षाला धोका होऊ शकतो, असे यावेळी काकडे म्हणाले.
पक्षाने नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर बंदी आणावी- भाजपचे माजी खासदार संजय काकडे
शरद पवारांना ट्विटवरून धमकी : गेली काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात तणावाची स्थिती असताना चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. तुमचा दाभोळकर करू, अशी शरद पवारांना ट्विटवरून धमकी देण्यात आली आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशी जर धमकी आली असेल त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. ज्याने धमकी दिली आहे, त्याच्यावर कठोर कारवाई होईल. शरद पवार यांचे कोणीही शत्रू नाही. ज्याने धमकी दिली आहे. त्याने खोडसाळपणा केलेला आहे. गृहमंत्री सक्षम असून संबंधितांवर कारवाई होईल, असे यावेळी काकडे म्हणाले.
कडक कारवाई करण्यात येणार : निलेश राणे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याबाबत काकडे म्हणाले की अश्या या वक्तव्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. अश्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत बोलणे हे पक्षाचे धोरण नाही. कोणीही असे वक्तव्य करू नये, असे देखील यावेळी काकडे म्हणाले. यावेळी कोल्हापूर येथील झालेल्या घटनेवर काकडे म्हणाले की, राज्याचा गृहविभााग तसेच पोलीस हे सक्षम आहेत. कोणीही अफवा पसरू नये. तसेच ज्यांनी असे केले आहे, त्यांच्यावर पोलिसांच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी काकडे म्हणाले.
हेही वाचा :