ETV Bharat / state

Medha Kulkarni Post : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज - Medha Kulkarni Post

वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत चांदनी चौकातील पुलाचे उद्घाटन होणार (Inauguration of Chandni Chowk Bridge) आहे. या सोहळ्यापूर्वीच भाजपाचा अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former BJP MLA Medha Kulkarni) यांनी सध्याचे आमदार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

Medha Kulkarni
Medha Kulkarni
author img

By

Published : Aug 11, 2023, 10:23 PM IST

पुणे : केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवारी चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन (Inauguration of Chandni Chowk Bridge) होणार आहे. मात्र, याबाबत भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former BJP MLA Medha Kulkarni) यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा जाहीर निषेध केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सध्याचे नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कोथरूडमधील कार्यक्रमाबाबत दु:ख : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मला पक्षाने डावल्याबाबत मी कधीच जाहीर वाच्यता केलेली नाही. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेण्यात आल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. मात्र, आता माझ्या मनात दु:ख राहत नाही. मला वाटले तुमच्याशी बोलावे. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली त्याबाबत अतिशय दु:ख झाल्याची खंत देखील कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न : चांदणी चौकाचे संपूर्ण श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना जाते. पण ही बाब त्यांच्यापर्यंत कोणी नेली? काही वर्षांपूर्वी, एका कार्यक्रमात जाहीर भाषणात स्वत: गडकरी म्हणाले होते की, "मी तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून हा मुद्दा उचलला होता". असे अनेक संदर्भ देता येतील. 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. पण कोथरूडचे सध्याचे नेते सगळे श्रेय स्वतःचे आहे, असे वागत आहेत. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? असे देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

स्थानिकांना मी नको आहे : मध्येच आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहाजी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणाचे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असूनही मला पास देण्यात आला नाही. साध्या कोथरूडच्या नेत्यांना मी अपेक्षित नसेन, तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्ष मी या गोष्टी सहन करीत आले आहे. वर्षानुवर्षे मला याचा त्रास होत आहे. त्यावेळी वरिष्ठांसमोर सर्व गोष्टी मांडल्या होत्या असे देखील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मेधा कुलकर्णी यांची पोस्ट :

असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे “माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच ते या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, नामनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.