बारामती (पुणे) - बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पाच दुकाने फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. शहरातील शिवाजी चौकातील सुखशांती अपार्टमेंट जवळ ही चोरीची घटना घडली असून चोरांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी चोरट्यांनी चोरी करत असताना आईस्क्रीमवरही डल्ला मारल्याचेही समोर आले आहे.
गॅस कटरने फोडली दुकाने....
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने शिवाजी चौकातील गजबजलेल्या ठिकाणी ही चोरी केली आहे. यामध्ये चप्पल, कलर, डिसाईनिंग, आईस्क्रीम पार्लर दुकानात चोरी केली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडत असताना दुकान मालकांना दुकाने फोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बारामतीत फोडली पाच दुकाने; चोरट्यांनी रकमेसह आईस्क्रीमही लांबवले - baramati latest news
बारामती शहरातील पाच दुकांने चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे लहान व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.