पुणे : अंमली पदार्थ विराेधी पथकास सातारा येथून मुंबईला माेठ्या प्रमाणात मेथामाफेटामीन, या अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा येथून आराेपींच्या काळ्या रंगाच्या फाेर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग केला. खेड शिवापूर टाेलनाका येथे गाडी आली असताना, कस्टम पथकाने संबंधित गाडी पकडली. त्यावेळी गाडीत दाेघेजण हाेते. त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला ८५० ग्रॅम मेथामाफेटामीन मिळून आले.
२०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त : या दोघांकडे अधिक तपास केला असता, या दोघांचे आणखी दाेन साथीदार हे लाेणावळ्यात त्यांना भेटणार होते. अशी माहिती अंमली विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार कस्टमच्या पथकाने लाेणावळ्यात आणखी दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही २०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. तर अधिक तपास पोलीस करत आहे. पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून ड्रग्ज रॅकेटवर करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील ड्रग्ज रॅकेटवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
अंमली पदार्थ नष्ट करण्याचे काम: या आधीही मुंबई येथे अशीच घटना घडली होती. नवी मुंबई सीमाशुल्क विभागाकडून वेळोवेळी अशाप्रकारे अंमली पदार्थ नष्ट करण्याचे काम सुरू असते. मुंबई सीमा शुल्क विभाग कक्ष 3 च्या माध्यमातून 350 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते . यामध्ये 9 किलो कोकेन, साडे 16 किलो हेरॉईन, 190 किलो मेटामाईन, 100 किलो गांजा, मँड्राक्स टॅब्लेट, एमडीएमए 298 टॅब्लेट अशा तब्बल 350 कोटी ड्रग्जची विल्हेवाट लावली होती. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1500 कोटी रुपये इतकी होती. ही कारवाई डीआरआय, विमानतळ आयुक्तालय आणि कुरिअर विभागाने केली होती.
हेही वाचा -