ETV Bharat / state

रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड - पिंपरी-चिंचवड येथे रिक्षा तोडफोड प्रकरणी पाच जणांना अटक

तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील म्हातोबा नगर येथे सुरक्षा रक्षक किरण घाडगे याने इतर साथीदारांच्या मदतीने दगडाने रिक्षांच्या काचा फोडल्या होत्या. घटने प्रकरणी पाच ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

Five arrested in rickshaw vandalism case at pimpari-chichvad, pune
रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
author img

By

Published : Jun 15, 2021, 1:05 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे. तीन दिवसांपूर्वी कॉप्लेक्सच्या समोर पार्क केलेल्या रिक्षा आरोपी सुरक्षा रक्षाकाने मित्रांच्या मदतीने फोडल्या होत्या. याप्रकरणी तात्काळ पाच आरोपींना अटक करून त्यांची धिंड वाकड पोलिसांनी काढली आहे.

रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

याप्रकरणी, किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे आणि अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तेरा रिक्षांची केली तोडफोड -

तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील म्हातोबा नगर येथे सुरक्षा रक्षक किरण घाडगे याने इतर साथीदारांच्या मदतीने दगडाने रिक्षांच्या काचा फोडल्या होत्या. घटने प्रकरणी पाच ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. किरण घाडगे हा नवीन व्यावसायिक बांधलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षक आहे. इमारतीसमोरच तेथील काही रिक्षा चालक रिक्षा पार्क करतात. याप्रकरणी किरण घाडगे याने संबंधित रिक्षा चालकांना वारंवार रिक्षा पार्क करू नका असे सांगितले. मात्र, इमारतीच्या समोरच रिक्षा पार्क केल्या जात असल्याने संतापलेल्या किरणने साथीदारांच्या मदतीने मध्यरात्री मद्यपान करून तेरा रिक्षांची दगडाने तोडफोड केली. मात्र, म्हातोबा नगर येथील नागरिकांच्या मनात असलेली भीती नष्ट करण्यासाठी आरोपींची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.

हेही वाचा - पुणे पालिकेतील क्लासवन महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना पकडले

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.