ETV Bharat / state

127 वर्षात प्रथमच मुख्य मंदिरामध्येच होणार श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव - अशोक गोडसे न्यूज

127 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे. गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण यासह इतरही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

DagaduSheth Ganesha
दगडूशेठ गणपती मंदिर
author img

By

Published : Aug 10, 2020, 12:55 PM IST

Updated : Aug 10, 2020, 5:01 PM IST

पुणे- कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करून श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचा निर्णय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. 127 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे. गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

अशोक गोडसे - अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट

भव्यदिव्य देखाव्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ओळखला जातो. दरवर्षी देशभरातील प्रमुख मंदिरांचे भव्यदिव्य देखावे साकारण्यासाठी या गणपती ट्रस्टची ओळख आहे. हा देखावा पाहण्यासाठी पुण्यासह राज्यभरातून नागरिक येत असतात. परंतु, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आणि बाप्पांच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी लक्षात घेता रस्त्यावर होणारा हा उत्सव मंदिरातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण यासह इतरही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गणेशभक्तांना मंदिरात प्रवेश न करता बाहेरूनच बाप्पाचे दर्शन भाविकांना घेण्यात येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळ, देखील स्वीकारले जाणार नाहीत आणि प्रसादही दिला जाणार नाही, असेही गोडसे यांनी सांगितले.

Last Updated : Aug 10, 2020, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.