पुणे : फळांचा राजा आणि सर्वांच्या लाडका फळ असलेल्या देवगड आंब्याची पहिली आवक पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल ( First mango in Pune ) झाली आहे. मार्केट यार्ड येथे या आंब्यासाठी बोली लावण्यात आलेली होती. आतापर्यतची सर्वाधीक बोली यंदा लागली असून तब्बल ४१ हजार रुपयांनी पहिली आंब्याची पेटी विकली गेली आहे. या पेटीत आंब्याचे ६६ नग आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जयेश कांबळे या शेतकऱ्याचा हा आंबा होता.
पुण्यात पहिला आंबा : यंदा आंब्याच्या हंगामातील पहिलाच आंबा पुण्यातील मार्केटयार्ड येथे दाखल झाला असून मागच्या हांगमापेक्षा जास्त यंदा आंब्याला भाव मिळाला आहे. तब्बल ४१ हजार रुपयांनी पहिली आंब्याची पेटी विकली गेली आहे. या पेटीत आंब्याचे ६६ नग आहेत. म्हणजेच एका आंब्याला 621 रुपये एवढा दर मिळाला आहे. दरवर्षी पेक्षा एक महिने आधीच आंबे बाजारात दाखल झाल्याने या आंब्याला जास्त भाव मिळाला आहे.
यावर्षी लवकर सुरूवात : दरवर्षी जानेवारी मध्ये आंबे हे मार्केट मध्ये दाखल होत असतात पण यंदाच्या या हंगामाला लवकर सुरवात झाल्याने शेतकरी तर खुश आहेच. पण जे ग्राहक वर्षभर आंब्याची प्रतिक्षा करत असतात त्यांच्यासाठी देखील ही आनंदाची बाब आहे.