पुणे - फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे यंदाच्या मोसमातले आगमन झाले असून पेटीला 25 हजाराचा घसघशीत भाव घेत हापूसची पुण्यात एन्ट्री झाली आहे. यावेळी बाजार समितीच्या प्रशासकांच्या हस्ते पेटीचे पूजन करून लिलाव करण्यात आला.
15 दिवस आधीच हापूस बाजारात दाखल
पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये 2021 मधील आंब्याची पहिल्या पेटी नामदेव रामचंद्र भोसले यांच्या गाळ्यावर दाखल झाली. यंदाच्या वर्षी कोरोना संकटाचा प्रभाव बाजारावर दिसतो आहे. मात्र, हापूस आगमनावर त्याचा परिणाम झालेला नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा यंदा 15 दिवस आधीच हापूस आंबा पुणेकर हापूसप्रेमींच्या सेवेसाठी हजर झाला आहे. शिवाय, हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला विक्रमी 25 हजार रूपये भाव मिळाला आहे.
हेही वाचा - पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांचा ५०० किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास
देवगडच्या आंबा उत्पादकाने पाठवली पहिली पेटी
गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी पहिल्या पेटीला जास्त भाव मिळाला आहे. गेल्या वर्षी पहिल्या पेटीला 21 हजार रुपये भाव मिळाला होता. तो यावर्षी 25 हजार मिळाला असून यंदाची ही पेटी देवगड येथील आंबा उत्पादकाने पाठवली आहे. दरम्यान, हापूस आंबा तसेच इतर आंब्याची आवक सुरू व्हायला अवकाश आहे. गुडीपाडव्याच्या आसपास आंब्याची व्यवस्थित आवक सुरू होत असते.
हेही वाचा - अकोल्यात चिकन महोत्सवाचे आयोजन; उपस्थितांनी मारला चिकन, अंडींवर ताव