पुणे - महामार्ग सुरक्षा पथक, पुणे प्रादेशिक विभाग यांच्यावतीने आज मंगळवारी द्रुतगती महामार्गावरील कामशेत बोगदा येथे स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते २ या वेळेत ३ तासांसाठी पहिली आणि दुसरी लेन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहने संथ गतीने धावणार आहेत. त्यादरम्यान, तिसऱ्या लेनमधून वाहने मार्गस्थ करण्यात येणार आहेत.
महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक तिसऱ्या लेनमधून मार्गस्थ करण्यात येणार आहे. त्यामुळे खालील ठिकाणी वाहतूक काही प्रमाणात संथ गतीने सुरू राहणार आहे.
हे वाचलं का? - राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या - संजय राऊत
संबंधित कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी पहिली व दुसरी लेन ३ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यानच्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्यास आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे पुलावरून जुना-मुंबई महामार्ग (NH-4) ने मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत. ११ ते २ च्या वेळेत पुण्याकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी व प्रवाशांनी कामशेत बोगद्यादरम्यान कमी वेगाने वाहने चालवून महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.